Homeनागपूर न्यूजकाँग्रेसचा गड आम्ही परत मिळवूः मुकुल वासनिक

काँग्रेसचा गड आम्ही परत मिळवूः मुकुल वासनिक

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

 ठाकरेंच्या समर्थनार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय नेते नागपुरात

मध्य नागपूकमध्येही जन आशीर्वाद यात्रेला उदंड प्रतिसाद

नागपूर, ता. ६ एप्रिलः नागपूरकरांच्या नस-नसात काँग्रेस असून नागपूर म्हणजचे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यंदा हा काँग्रेसचा गड आम्ही परत मिळवणार आहोत. तसेच विकास ठाकरेच नागपूरचे खासदार बनणार असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी सांगितले.

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तमेवार यांच्या घराजवळ भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या अवैध आंदोलनावर बोलताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले, जन सामान्यांकडून मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहून भाजपच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे असे कृत्य करण्यात येत आहे, मात्र यंदा विकास ठाकरेंचा विजय निश्चित आहे. नागपूरची लोकसभा निवडणूक फक्त नागपूरपुरतीच मर्यादीत नसून ही देशाची लढाई आहे आणि विकास ठाकरेच जिंकत असल्याचा संदेश देशभरात पोहोचत आहे. तसेच देशात इंडिया आघाडीचे सरकार निवडून येत आहे.”

इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेअंतर्गत शनिवारी सकाळी मध्य नागपुरातील नागरिकांशी नेत्यांनी संवाद साधला. यावेळी प्रामुख्याने माजी मंत्री अनिस अहमद, बंटी शेळके, अतुल कोटेचा, किशोर पराते, श्री कांद्रिकर यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यात्रेत नागरिक स्वतः उत्स्फूर्तपणे सहभागी झाले असून त्यांनी यंदा परिवर्तन घडणारच अशी हाक दिली.

रविवारी पश्चिम नागपुरात जन आशीर्वाद यात्रा-

रविवारी (ता. ७ एप्रिल) पश्चिम नागपुरात जन आशीर्वाद यात्रा निघणार असून सकाळी आठ वाजता वंजारी माता मंदिर येथून यात्रेला सुरुवात होईल. भीनसेन चौक शिवमंदिर-चौरसिया चौक-पोस्ट ऑफिस शिवाजी डेकोरेशन-छोटा गड्डीगोदाम-कामठी चौक-धोबीपुरा-शितलामाता मंदिर-राजभवन भित-गवलीपुरा-जैन मंदिर-ईदगाह-गांधी चौक येथे सकाळच्या सत्राची यात्रा समाप्त होईल.

सायंकाळी पूर्व नागपुरात जाहीर सभा-

रविवारी सायंकाळी शिनगर, भांडेवाडी पारडी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रामुख्याने माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तमेवार, डॉ. सतीश चतुर्वेदी, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार अभिजीत वंजारी नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

…………………………………

Advertisements

Latest बातम्या