फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूरात राष्ट्रवादी साजरा करणार "स्वराज्य"सप्ताह

नागपूरात राष्ट्रवादी साजरा करणार “स्वराज्य”सप्ताह

Advertisements

१२ ते १९ फेब्रुवरी दरम्यान स्वराज्य सप्ताह चे आयोजन: छत्रपतींचा पालखी सोहळा व प्रदर्शन

नागपूर, ता. १० फेब्रुवरी २०२४: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात स्वराज्य सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत शिवकालीन वस्तूचे प्रदर्शन, पालखी सोहळा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, बाल शिवाजी वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत पवार आणि जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी दिली.

१२ ते १९ दरम्यान नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा आणि ग्रामीणमधील सहा विधानसभा मतदारसंघात स्वराज्य पताका, सेल्फी विथ किल्ला, शिवरायांच्या स्वराज्यासंबंधीत चित्र प्रदर्शन आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या तयारीसाठी शहरातील पदाधिकाऱ्यांची बजाजनगर कार्यालय तर ग्रामीणची बैठक रविभवन येथे घेण्यात आली. या उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस, युवक व युवती, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी करून घेण्यात येणार आहे.

या दरम्यान घराघरात शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा लावण्यात येणार आहे तसेच स्टिकर चिटकवण्यात येणार आहेत. याशिवाय क्यूआर कोडच्या माध्यमातून या उपक्रमात विद्यार्थी व नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे पवार आणि गुजर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विविध स्पर्धेत प्रथम,द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना अनुक्रमे १००१,५०१ तसेच प्रमाणपत्र देण्यात येईल.याशिवाय अस्तेडू आखाडा फेडरेशन ऑफ भातरतर्फे पाऊण तास प्रात्यक्षिक सादर होणार असल्याचे पवार म्हणाले.कॉटन मार्केट येथील.गीता मंदिर समोरील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला शासनाची परवानगी मिळाल्यास जलाभिषेक करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.

मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांतर्फे घेण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी निर्णयाची माहिती फ्लकां द्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्यात येईल.अशी माहिती त्यांनी सांगितली.

यावेळी नरेश अरसडे, बागेश्वर फेंडर, सुधाकर तिबोले, दिलीप सानगडीकर, अभिलाषा वनमाळी, हिमांशू पंचभूते, संदीप सावरकर, अरविंद भाजीपाले, प्रशांत अग्रवाल, रवी पराते, योगेश ठाकरे, राकेश बोरीकर, जया देशमुख, राजेश माटे, राहूल कांबळे आदी उपस्थित होते.

…………………………………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या