

बैठकीत पदाधिका-यांचे मत
१ मार्च पासुन विधानसभानिहाय बुथ प्रचाराला करणार सुरुवात
उमेदवारी काेणालाही मिळो, वाट न पाहता कामाला लागा: विकास ठाकरेंचे आवाहन
निरिक्षकांची होणार नेमणूक
लोकसभेच्या उमेदवाराचे संचालन शहर काँग्रेसकमेटीच्या कार्यालयातून व्हावे:महत्वाची मागणी
ब्लाॅक अध्यक्षांकडून काम होत होत नसेल तर त्यांनी लेखी द्या, त्यांच्या जागी दुसरी नियुक्ती करु
नागपूर,ता.९ फेब्रुवरी २०२४: नागपूर शहर जिल्हा काॅंग्रेस कमेटीची महत्वपूर्ण बैठक महाकाळकर सभागृह येथे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढावी असे मत उपस्थित पदाधिका-यांनी मांडले.
शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीच्या पूर्व तयारी बाबत चर्चा करतांना सांगितले की,लोकसभा उमेदवारी कोणालाही मिळू दे, वाट न पाहता सहा ही विधानसभा निरिक्षकांची नेमणूक करुन विधानसभानिहाय प्रभाग,वार्ड तसेच २० तारखेपर्यत यंत्रणा तयार करुन बुथ निहाय १ मार्च पासुन प्रचारयात्रेची सुरुवात करण्याची सूचना त्यांनी केली. प्रचारमाध्यमातुन दहा वर्षात मोदी सरकारने सामान्य जनतेच्या घरोघरी जावून काय काम केले,हे जनतेच्या लक्षात आणून देण्याचे व मोदी सरकारचे अपयश सांगणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
याशिवाय लोकसभा उमेदवाराचे संचालन शहर काॅंग्रेसकमेटीच्या कार्यालयातून व्हावे,अशी महत्वपूर्ण मागणी त्यांनी केली.प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रचार कार्य सुरु करुन प्रचार समिती,कंट्रोल रुम तयार करण्यात येईल. प्रचार माध्यमाकरीता काॅंग्रेस पक्षाचे विडियो तयार करुन वाॅट्सअॅप,सोशल मिडिया वर टाकावे, फ्रन्टल प्रमुख महिला काॅंग्रेस,सेवादल,युवक काॅंग्रेस यांनी आपल्या कार्याचा आढावा शहर काॅंग्रेस कमिटीला दयावा. लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून कामाला लागण्याची सूचना त्यांनी केली. ब्लाॅक अध्यक्षांना निर्देश दिले कि,दोन दोन दिवसाचे अंतर ठेवून वार्ड व बुथ निहाय बैठक लावावी तरच काॅंग्रेस पक्ष मजबूत होईल आणि लोकसभेमध्ये फायदा मिळेल.
शहर काॅंग्रेस कमेटीचे पदाधिकारी यांनी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी मागण्याची विनंती केली व विकास ठाकरे हे जर काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढण्यास, लोकसभा निवडणूक जिंकू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपण मतभेद सोडून एकजूटपणे कार्याला लागावे. मतदार यादी शहर काॅंग्रेस कमेटीकडे आलेली आहे. ब्लाॅक अध्यक्षांनी बुथ निहाय वाटून मतदाराला भेटून मतदारांचे नाव आहे किवा नाही हे तपासण्याची सूचना विकास ठाकरे यांनी केली. जर मतदार यादीत नावे जास्त असतील तर ती नावे काढण्याचा प्रयत्न करावा. नवीन मतदार नोंदविण्याचे कार्य करावे,अशी सूचना त्यांनी केली.
या संदर्भात पुन्हा एकदा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.लोकसभा उमेदवाराचे अॅड. अभिजीत वंजारी यांनी शहर काॅग्रेस कमेटी मार्फत संचालन ंकरावे व प्रामाणिकपणे तन मन धनाने पक्षाच्या कार्याला लागावे असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे महासचिव अतुल कोटेचा यांनी मोदी सरकारला समजण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री घरकुल योजना मार्फत लोकांना घरे साधारण किमतीत न मिळता मोठया प्रमाणात देण्यात आली.सामान्य जनतेचा विचार केला नाही असे सांगून, प्रत्येक कार्यकर्त्यांनी याचा विचार करावा व मोठ्या संख्येने तरुणांना सोबत घेण्याची सूचना केली.
बैठकीला अॅड अभिजीत वंजारी,अतुल कोटेचा,संजय महाकाळकर, प्रशांत धवड,गिरीश पांडव,रमेश पुणेकर,पुरुषोत्तम हजारे,डाॅ.गजराज हटेवार,रमन पैगवार,प्रा.दिनेश बानाबाकोडे,नॅश अली,दयाल जशनानी,मिलिंद दुपारे,महेश श्रीवास,डाॅ.सुधीर आघाव,संजय सरायकर,अॅड अक्षय यावले,बंडोपंत टेंभुर्णे,विश्वेष्वर अहिरकर,मोतीराम मोहाडीकर,ज्ञानेश्वर ठाकरे,देवेद्र रोटेले,अनिल ठेंगरे,मामा राउत ,वंदना चहांदे,ईरशाद अली, मनीष चांदेकर,रजत देशमुख,पुरुषोत्तम लोणारे,डाॅ.प्रकाश ढगे,नितीन साठवणे,अणाजी राउत,पुरुषोत्तम गौरकर,डाॅ.मनोहर तांबुलकर,हेमत चैधरी,धरम पाटिल,आशिष दिक्षित,प्रशांत पाटील,अक्षय समर्थ,योगेश कंुजलकर, ऋतिका डफ,अमित शिदे,विद्यासागर त्रिपाठी,प्रकाश लायसे,राजेष कुंभलकर,श्रीकांत ढोलके, ईरशाद मलिक,सुनिता ढोले,राजाभाउ चिलाटे,वंदना मेश्राम,नंदा देशमुख,विनित चैरसिया,यशवंत मेश्राम,राजेश साखरकर,सुनिल पाटिल,शिवशंकर रणदिवे,अब्दुल गफफार शेख,सारिका दुपारे सहित पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते
……………….




आमचे चॅनल subscribe करा
