
नागपूर,ता.५ फेब्रुवरी २०२४: महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पूजा पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली IQAC ची एक संकल्पना असलेल्या ‘ग्रीन अर्थ – क्लिन अर्थ’ या शीर्षकावर आधारीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.१० फेब्रुवारी २०२४ रोजी नियोजित असलेल्या या परिषदेचे उद्देश्य हवामान बदलामुळे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अतिवापरामुळे वसुंधरेच्या होत असलेल्या ऱ्हासापासून संरक्षणाची आवश्यकता व अस्तित्व अबाधीत राखण्याची संकल्पना मनामनात रुजविणे हे होय.
महाविद्यालयाने ‘सेव्ह अर्थ सेव्ह फ्यूचर – वसुंधरा संवर्धन’ या थीम अंतर्गत, जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अनुषंगाने स्वच्छ आणि हिरवळीने समृद्ध भूमी संवर्धन धोरणांवर चर्चा आणि अंमलबजावणी करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ, विद्वान विचारवंतांना एकत्र आणून प्रबोधनात्मक विचारमंथन आयोजिले आहे.
सदर परिषद ज्ञानाची देवाणघेवाण, सहयोग आणि शाश्वत भविष्यासाठी कृती करण्याकरिता व्यासपीठाच्या उपलब्धतेचे वचन देते. अभ्यासकांना दृष्टीपूर्ण चर्चेत सहभागी होण्याची आणि ज्ञानकक्षा विस्तृत करून भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य, अश्या धरणी मातेचे संवर्धन करण्याच्या सामूहिक प्रयत्नात योगदानाची संधी प्रदान करेल.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे हे परिषदेचे प्रमुख पाहुणे असून वुमेन ऐज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडवोकेट सुनील मनोहर उद्घाटन सत्राची शोभा वाढवतील.
श्रीमती संचिता जिंदाल, माजी सल्लागार (शास्त्रज्ञ G), पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय , भारत सरकार. “वेस्ट मॅनेजमेंट फॉर क्लिन ॲण्ड ग्रीन अर्थ” या विषयावर मुख्य भाषण देतील.
डॉ. विशाल सरदेशपांडे, एडजंट सहयोगी प्राध्यापक, सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह फॉर रुरल एरिया, आयआयटी पवई, मुंबई. हे तांत्रिक सत्र- I चे वक्ता आहेत. ते “रोल ऑफ ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी टू डील विथ क्लायमेट चेन्ज ॲण्ड सस्टेनॲबलिटी” या विषयावर बोलतील.
श्रीमती उत्तरा पांडे, टीम लीडर इनव्हारमेंटल, डब्लूएसपी इंडिया. तांत्रिक सत्र -II A च्या वक्ता आहेत. त्या ” इकोसिस्टीम रिस्टोरेशन बाय इंडिजिनस मेथड” या विषयावर चर्चा करतील. डॉ. प्रवीण मोते, डायरेक्टर, सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव, नागपूर, तांत्रिक सत्र- II B चे वक्ता आहेत, ते “इनव्हारमेंट ॲण्ड क्लायमेट चेन्ज” या विषयावर मार्गदर्शन करतील.
डॉ. राहुल राळेगावकर, प्राध्यापक, व्हीएनआयटी, श्री मुकुंद पात्रीकर, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, सामाविद इन्टरनॅशनल प्रा. लि.( अ सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी ग्रुप) वॉटर शॉपी वर्ल्डवाइड (ओपीसी) प्रा. लि., डॉ. अनुपमा कुमार प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, रसायनशास्त्र विभाग, फेलो, महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस ॲण्ड वुमेन सेलच्या माजी अध्यक्षा, व्हीएनआयटी, नागपूर, हे तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. डॉ. टुटू सेनगुप्ता, डॉ. नंदा राठी, डॉ. संगीता सहस्रबुद्धे ह्या पेपर प्रस्तुतीकरण सत्राच्या अध्यक्षस्थानी राहतील.डॉ. दीपाली चहांदे या संमेलनाच्या संयोजक आहेत. डॉ.प्रचिती बगाडे आणि डॉ.मीनाक्षी कुळकर्णी या संमेलनाच्या सहसंयोजक आहेत.
या परिषदेत संबंधित क्षेत्रातील मान्यवर व तज्ञ विचारवंत उपस्थित असतील. मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली विविध सत्रांमध्ये संशोधक आणि विद्वानांचे शोधनिबंध सादर केले जातील. समग्र भारतातील १५० संशोधकांच्या सहभागाची अपेक्षा आहे.
एल. ए. डी. आणि श्रीमती आर. पी. महिला महाविदयालयात दिनांक – १० फेब्रुवारी २०२४ रोजी “ग्रीन अर्थ क्लिन अर्थ” या शीर्षकाअंतर्गत आयोजित परिषदेला इच्छूक व्यक्ती, संस्था आणि सहभागींना आमंत्रित करीत आहे. आपल्या वसुंधरेला सुजलाम सुफलाम करण्यासाठी व उज्वल, निरोगी भविष्य देण्यासाठी आपण एकत्र काम करावे. ही भूमीका सदर परिषदेच्या अग्रस्थानी आहे.
अधिक माहिती, नोंदणी आणि तपशीलांसाठी, कृपया https://ladcollege.ac.in. या संकेत स्थळाला भेट द्यावी. परिषदेच्या दिवशी, १० फेब्रुवारी २०२४ रोजी स्पॉट नोंदणी देखील केली जाऊ शकते.
मोठ्या संख्येने परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
