
नागपूरात तांत्रिक उत्कृष्टतेचे दिपस्तंभ ठरणार: प्राचार्य डॉ.हांडे यांचा विश्वास
नागपूर, २७ जानेवारी २०२४: नागपूरातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील एक महत्वाचा आधारस्तंभ असलेल्या के डी के अभियांत्रिकी महाविद्यालयाने शैषणिक वर्ष २०२४-२५ पासून विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे दिला जाणारा आणि प्रतिष्ठेचा मानल्या जाणारा ‘स्वायत्त’ दर्जा मिळवून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. हे नवीन रुपांतरण के डी के अभियांत्रिकी महाविद्यालयाची धोरणे, जसे की शैक्षणिक उत्कृष्टता आणि सतत नाविन्यपूर्णतेकडे वाटचाल करण्याची वचनबद्धता यांना अधिक मजबूत करून भविष्यातील उद्योगजगतासाठी लागणारे अभियंते घडवण्यात आघाडीची भूमिका निभवेल,असा विश्वास के डी के कॉलेजचे प्राचार्य डॉ.चंद्रहास सी.हांडा यांनी व्यक्त केला.ते आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.याप्रसंगी मंचावर उपप्राचार्य डॉ.अविनाश एम.बदर,अन्य उपप्राचार्य, डॉ.स्वप्नील साठवणे तसेच विभागप्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत १९८४ मध्ये स्थापीत के डी के अभियांत्रिकी महाविद्यालयाने चार दशकांहून अधिक अभियांत्रिकी शिक्षणाच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. सिव्हिल इंजि., मेकॅनिकल इंजि .इलेक्ट्रॉनिक्स इंजि, काॅम्प्युटर सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी,इलेक्ट्रॉनिक्स अँन्ड टेलिकम्युनिकेशन इंजि, इंफॉरमेशन टेक्नॉलॉजी आणि आर्टीफीशीअल इंटेलिजन्स अँन्ड डेटा सायन्स यासह विविध स्पेशलायझेशन मध्ये सात बी. टेक प्रोग्राम आहेत. या महाविद्यालयात स्ट्रक्चरल इंजि., मेकॅनिकल इजि. डिजाईन, एम बी.ए. आणि एम सी.ए. हे चार पदव्युत्तर अभ्यासकम आहेत, तसेच पीएच.डी मध्ये सिव्हील इंजि आणि मेकॅनिकाल इंजि हे अभ्यासकम
आहेत.
के डी के अभियांत्रिकी महाविद्यालयाचे हे यश गुणवत्तापूर्ण शिक्षणाप्रती असलेल्या त्याच्या अटूट निष्ठेवर अवलंबून आहे. महाविद्यालयाकडे प्रतिष्ठीत मानली जाणारी NAAC मान्यता आहे, जी कठोर शैक्षणिक मानकांचे पालन करण्याचे प्रमाण आहे. कॉलेजमध्ये NBA द्वारे मान्यता प्राप्त पाच अभ्यासकम व १५० प्रमाणन आहेत आमच्या महाविद्यालयाकडे उद्योग-संबंधीत अभ्यासक्रम आणि अत्याधुनीक प्रयोगशाळा पायाभूत सुविधा दर्शविते,असे डॉ.हांडा म्हणाले.
के डी. के. अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगीरी असनारे शिक्षक आहेत जे विद्यार्थ्यांवर उत्तम असे संस्कार करतात. महाविद्यालयात ४३ पेक्षा जास्त पीएच.डी धारक प्राध्यापक आहेत ज्यापैकी काही ३० वर्ष अधिक काळापासून समर्पितपणे अध्यापन करीत आहेत. अटूट समर्पणामुळे विविध संस्थांकडून के. डी. के. अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्याशाखा पुरस्कार आणि AICTE, New Delhi कडून संशोधन अनुदान मिळाले आहे. ही बांधीलकी एक पोषक आणि समृद्ध शैक्षणिक वातावरण निर्माण करते, जेथे सैद्धांतिक ज्ञान अनुप्रयोगासह मिसळते.
के डी.के. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि संपूर्ण व्यक्तीमत्व विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित आणि कठोर शैक्षणिक शिस्त त्यांच्या क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवतात. संस्थेत घेतले जाणारे प्रशिक्षण, विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनाला संवेदनशील बनवतात,असे डॉ.हांडा यांनी सांगितले.
शाश्वतेसाठी आपली वचनबद्धता अधिक दृढ करत, के. डी. के. अभियांत्रिकी महाविद्यालय विविध ‘हरीत ’उपकमे राबवून आपल्याला ग्रीन कॅम्पसचा अभिमान बाळगतो, ज्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण होते ISTE द्वारे प्रतिष्ठीत ग्रीन कॅम्पस पुरस्काराचा सन्मान महाविद्यालयाला प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
कॉलेज ‘आरएनडी’ उपक्रमात सक्रीयपणे गुंतले असून नाविन्यपूर्ण भावना वाढवित असतो तसेच ज्ञानाच्या प्रगतीमध्ये योगदान देत असल्याचे ते म्हणाले.आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन केल्याने ज्ञानाची देवाणघेवाण आणि जागतिक शैक्षणिक आणि उद्योग यांच्याशी सहयोग सुलभ झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्याशाखा सदस्य विद्यापीठाशी संबंधित क्रियाकलांपामध्ये सक्रियपणे सहभागी होतात.त्यांचे कौशल्य सामायिक करतात आणि अभियांत्रिकी शिक्षणाचे भविष्य घडवतात.कॉलेज आंतरमहाविद्यालयीन अभ्यासक्रम आणि सह-अभ्यासक्रम कार्यक्रमांमध्ये सहभागास सक्रियपणे प्रोत्साहन देत असल्याने,विद्यार्थ्यांनाही उत्कृष्टतेसाठी सजग आणि सशक्त केले जात असल्याचे ते म्हणाले.
स्वायत्त दर्जा के.डी.के अभियांत्रिकी महाविद्यालयाला शैक्षणिक स्वातंत्र्यांच्या नविन युगाला सुरवात करण्यात सक्षम करणार असून, याचा फायदा स्वत:चा अभ्यासक्रम तयार करणे यात होईल. उद्योगाच्या विकसित गरजा पूर्ण करण्यासाठी आणि भविष्यातील घडामोडींसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या उद्देशाने, कौशल्यपूर्ण करण्यासाठी, कार्यक्रमाची रचना आता कॉजेज स्वत: करु शकणार आहे.
लवचिक मुल्यमापण प्रणालीची सुरवात केली जाणार असून याद्वारे सखोल शिक्षण आणि समज वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण मुल्यांकन पद्धतीची सुरवात केली जाईल. स्वतंत्र परिणाम घोषणा या अंतर्गत, प्रक्रिया सुव्यवस्थीत करणे आणि निकाल वेळेवर वितरीत करणे, सुनिश्ति करणे याशिवाय औद्योगीक सहयोग वाढविला जाईल. अभ्यास मंडळामध्ये उद्योग तज्ञांना एकत्रित करणे, कॉर्पोरेट जगाशी जवळचे संबंध वाढवणे आणि अभ्यासक्रमाची प्रासंगिकता सुनिश्चित करणे,महाविद्यालय करणार आहे. शैक्षणिक चपळतेसाठी प्रयत्नरत राहणार असून, जगाच्या पुढे राहण्यासाठी तसेच नवीनतम तांत्रिक प्रगती समाविष्ट करण्यासाठी ,अभ्यासकम आणि कार्यक्रमांना या पुढे के.डी.के अभियांत्रिकी महाविद्यालय अनुकूल करणार असल्याचे डॉ.हांडा यांनी सांगितले.
स्वायत्त दर्जाची प्राप्ती हा एक सामुहीक विजय आहे, जो संपूर्ण के.डी. के. अभियांत्रिकी महाविद्यालय समुदायाचे समर्पण प्रतिबिंबीत करतो. महाविद्यालयाच्या अध्यक्षा श्रीमती सुमनमाला मुळक आणि कोषाध्यक्ष यशराज मुळक यांचे सतत सहकार्य आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले. महाविद्यालय बँकवर्ड क्लास युथ रिलीफ कमेटीचे के डी के अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सचिव राजेंद्र मुळक यांचे त्यांच्या महत्वपूर्ण सहकार्याबद्दल याप्रसंगी डॉ.हांडा यांनी आभार मानले.
उत्कृष्ट महाविद्यालय बनविण्यासाठी ‘दुरदृष्टी व समृद्धी’ हे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै.भाऊसाहेब मुळक यांचे नेहमीच स्वप्न राहीले आहे. दर्जेदार तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवेसाठी नवीन उंची गाठणारे महाविद्यालय उभारण्याची, त्यांची दृष्टी आणि आंकाक्षा आम्हाला सतत प्रेरणा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
के डी के अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्राप्त झालेला ‘स्वायत्त’ दर्जा हा केवळ महाविद्यालयासाठीच नव्हे तर या प्रदेशातील संपूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाच्या लॅन्डस्केपसाठी एक महत्वाचा टप्पा असल्याचे ते म्हणाले. या स्वायत्त दर्जासह के डी के अभियांत्रिकी महाविद्यालय नविन उंची गाठण्यासाठी, महत्वाकांक्षी अभियंत्यांना आकार देण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सज्ज झाले आहे. हा महत्वाचा प्रसंग साजरा करण्यासाठी आणि के डी के अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर साठी पुढे असलेल्या रोमांचक क्षणांच्या साक्षीदार होण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली असल्याचे ते म्हणाले.
स्व. भाऊसाहेब मुळक यांनी स्थापन केलेली ही संस्था आणि त्यातील सेवेत असलेले व सेवानिवृत्त शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी, पालकवर्ग यांच्या सहकार्याने आता के डी के कॉलेजला स्वायत्त दर्जा प्राप्त झाला असल्याचे माजी आमदार राजेंद्र मुळक यांनी संदेशाद्वारे कळवले.
…………….




आमचे चॅनल subscribe करा
