

नागपूर,ता.११ जानेवरी २०२४: नायलॉन मांजाच्या विरोधात दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतर्फे कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर आयोजित भव्य जनजागृती रॅली सक्करदरा चौक ते पतंग मार्केट जुनी शुक्रवारी पर्यंत वाजता काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी दुकानात जाऊन विक्रेत्यांना आणि नागरिकांना भेटून नायलॉन मांजा बद्दल जनजागृती केली.
ज्या नायलॉन मांजामुळे नागरिकांचा बळी जातो व पशु पक्ष्यांचा बळी जातो अश्या मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्याची माहिती जो व्यक्ती देईल त्याला पाच हजार रुपये इनाम राशी देण्यात येईल सोबतच जास्तीतजास्त माहिती जो देईल त्याला अकरा हजार रुपये देण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यावेळी म्हणाले.
नायलॉन मांजाची विक्री आणि उपयोग थांबवण्यासाठी विभागामार्फत अधिकची यंत्रणा संक्रांतीच्या दिवसांमध्ये राबवून कडक कारवाई दोषींवर करावी. राष्ट्रीय व राज्य हरित लवादाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने नायलॉन मांजाची विक्री, साठवणुकीवर बंदी घातली. दर वर्षी याबाबत जिल्हाधिकारी आणि शहरात पोलिस आयुक्त तसे आदेश जारी करतात व या तात्पुरत्या बंदीने उत्पादनावर काहीच फरक पडत नाही, त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर आणि बंदीचा विषय ‘येरे माझ्या मागल्या’ असा ठरत आहे यावर कडक कारवाई करण्यात यावी असे यावेळी म्हटले.
या भव्य रॅली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष प्रशांत पवार, प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुधे, राज्य महिला आयोग सदस्या आभाताई पांडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर, प्रदेश सचिव आंनद सिंग, प्रदेश संघटक सचिव हाजी सोहेल पटेल, सामाजिक न्याय शहर अध्यक्ष अरविंद ढेंगरे, युवक शहर अध्यक्ष विशाल खांडेकर, विद्यार्थी अध्यक्ष विश्वजीत तिवारी, अल्पसंख्याक अध्यक्ष वसीम अन्सारी, दक्षिण विभाग अध्यक्ष अरविंद भाजीपाले, उत्तर विभाग अध्यक्ष राकेश बोरीकर, पूर्व विभाग अध्यक्ष प्रशांत अग्रवाल, दक्षिण-पश्चिम विभाग अध्यक्ष संदीप सावरकर, पश्चिम विभाग अध्यक्ष योगेश ठाकरे, भारती गायधने, मुमताज बाजी, निलिकेश कोल्हे, जयंत किनकर, नागेश देडमुठे, राहुल इंगळे, राहुल कामळे, मॉन्टी गंडेचा, राजू मिश्रा, पुरोहित कांबळे, स्वीकार शिंगरू, अनिकेत खोब्रागडे, निखिल चाफेकर, व इतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
…………………………




आमचे चॅनल subscribe करा
