
(छायाचित्र : यशवंत माेहिते)
नागपूर,ता.२१ जून २०२३: पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया(पीआरएसआय)नागपूर चॅप्टरच्या अध्यक्ष पदी महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांची निवड करण्यात आली आहे.पीआरएसआयच्या बुधवारी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने बिनविरोध त्यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यांच्या नावाचा प्रस्ताव संस्थेने मांडला.सभेला निवर्तमान अध्यक्ष एस.पी.सिंग उपस्थित होते.सर्व सदस्यांनी टाळ्या वाजवून पाठिंबा दर्शवला.इतर पदाधिका-यांमध्ये अखिलेश हळवे(महामेट्रो)यांची उपाध्यक्ष पदी,मनीष सोनी(नागपूर महानगरपालि व नागपूर स्मार्ट सिटी)सचिव पदी,प्रसन्न श्रीवास्तव(महावितरण)यांची सहसचिव पदी निवड करण्यात आली.याशिवाय शरद मराठे(मध्य प्रदेश पर्यटन मंडळ)यांची कोषाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

(छायाचित्र : मनीष सोनी)
तसेच प्रवीण टाके(जिल्हा माहिती अधिकारी),डॉ.मनोज कुमार(वेकोली)प्रवीण स्थूल(महावितरण)अमित बाजपेयी(एएए मिडीया)आणि निखिल सावरकर(पी आर टाईम्स) यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली.
हेमराज बागूल(माहिती संचालक),अनिल गडेकर माजी जिल्हा माहिती अधिकारी,एम.एम.देशमुख माजी जनसंपर्क अधिकारी, एस.पी. सिंग,डॉ.मोईज हक,डॉ.नितीन कराळे,प्रदीप कुमार मैत्र,शिरीष बोरकर हे संस्थेचे पालक तसेच सल्लागार म्हणून काम पाहतील.
……………………

आमचे चॅनल subscribe करा