
नागपूर,ता.१२ मे २०२३: गरुडा अम्यूझमेंट या खासगी कंपनीने अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बेकायदेशीररित्या उध्वस्त केले .त्या विरोधात अंबाझरी येथे मागील ११२ दिवसांपासून आंदोलन धरणे सुरू आहेत. भवन पाडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत व खाजगी कंपनीसोबत जो विकासाचा करार झाला आहे तो रद्द करण्यासाठी हे आंदोलन अविरत सुरु असताना व न्यायालयाने पोलिस विभागाला या संबंधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असताना देखील पोलिस प्रशासनाकडून न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
या आंदोलनाचे समर्थन करण्यासाठी पूर्व नागपूर विभागीय आंदोलनाचा आजचा पहिला दिवस होता .शासन-प्रशासन, दोन्ही हे स्मारक उध्वस्त करण्यास जबाबदार आहेत. कोर्टाने भवन पाडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असतांना देखील पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करीत नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात अाला.
पहिल्या दिवशीच्या आंदोलनात आंदोलनाचे उद् घाटक डॉ. धनराज डहाट, अध्यक्ष, किशोर गजभिये, छाया खोब्रागडे, डॉ. सरोज आगलावे, बाळू घरडे, उषा बौद्ध,राहुल परुळकर यांनी आंदोलन मंचावर विचार व्यक्त केले.
पहिल्या दिवशी हटवार यांचा कृती समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उज्वला गणवीर यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन अनुक्रमे जयश्री लोखंडे, सुविता लोखंडे यांनी केले.
आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी समता सैनिक दलाच्या रंजना वासे, ज्योती तिरपुडे, बबन वासे, विनोद हजारे, सत्यवान मेश्राम, दिलीप रामटेके, सावित्री मेश्राम, विश्वनाथ लोखंडे, धरणे आंदोलनस्थळी प्रबुद्ध नागरिकांनी परिश्रम घेतले.
…………………..

आमचे चॅनल subscribe करा