फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजलहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळणं गरजेचं:प्रदीप दाते

लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळणं गरजेचं:प्रदीप दाते

Advertisements

बाल रंगभूमी परिषदेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

नागपूर,ता.२३ मार्च २०२३: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईची घटक संस्था “बाल रंगभूमी परिषद नागपूर” चा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रभाषा सभेचे अध्यक्ष अजय पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्ष नरेश गडेकर होते, बाल रंगभूमी परिषद अध्यक्षा आभा मेघे तसेच प्रदीप मुन्शी, श्रद्धा तेलंग मंचावर उपस्थित होते.

प्रारंभी जेष्ठ रंगकर्मी स्व. मदन गडकरी, स्व गणेश नायडू यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.दीपप्रज्वलन आणि नटेश्वर पूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली, स्कुल ऑफ स्कॉलर प्रतापनगरच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना आणि स्वागत गीत सादर केले.

याप्रसंगीआपल्या मनोगतात प्रदीप दाते म्हणालेत की, लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळणं गरजेचं आहे आणि त्यांना ही संधी बाल रंगभूमी परिषद उपलब्ध करून देते ही अभिमानास्पद बाब आहे. तर अजय पाटील यांनी परिषदेच्या कार्याचं कौतुक करून सर्व उपक्रमात सोबतच राहणार असल्याचे आश्‍वासन दिले. याप्रसंगी नरेश गडेकर, श्रद्धा तेलंग, प्रदीप मुन्शी यांनीही विचार मांडले.आभा मेघे यांनी प्रास्ताविक, रुपाली मोरे यांनी मानपत्र वाचन, अनिल देव यांनी आभार प्रदर्शन तर वैदेही चवरे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून पार पडलेल्या सत्कार समारंभात पुढील रंगकर्मी आणि संस्थाचा समावेश आहे त्यात ज्येष्ठ रंगकर्मी सुनंदा साठे, संजय गायकवाड :- (मानपत्र शॉल श्रीफळ व बुके)
परिषदेसाठी विशेष योगदानाबद्दल- रघूवीर जोशी, रमेश भिसीकर, श्रीमती सुनीता गजबिये श्रीमती राखी परमार, स्वप्निल बंन्सोड ( नाटुकला चैनल )इत्यादींनी सहभाग नोंदवला.

स्वर्गीय पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती बालनाट्य लेखन स्पर्धेचा निकाल –

विदर्भ साहित्य संघ नागपूर व बालरंगभूमी परिषद नागपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता त्यात नागपूर विदर्भ सोबतच लातूर ,मिरज, रायगड ,वर्धा , मुंबई ,पुणे ,इचलकरंजी, ठाणे या शहरातून बालनाट्य लेखकाचा उत्तम प्रतिसाद या स्पर्धेत लाभला,

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
उत्तेजनार्थ द्वितीय डॉ गणेश वडोदकर (वाघाची पिल्ले) उत्तेजनार्थ प्रथम आजीचा खजिना (श्रीमती किमया विनायक नेरुसकर) तृतीय क्रमांक सुहास भोकरे (जादूगर वाजला काय पाहिजे ) द्वितीय क्रमांक श्रीमती वर्षा चौगुले (रंगात रंगावे)प्रथम क्रमांक अरविंद लिमये (एका चित्राची गोष्ट) या स्पर्धेच्या संहिता परीक्षणाचे कार्य माननीय उदयन ब्रम्ह , किशोर आयलवार , उदय पाटणकर, प्रदीप मुंशी यांनी पार पाडले.
बालरंगभूमी परिषद नागपूर शाखा व विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुषोत्तम दारव्हेकर बालनाट्य लेखन स्पर्धा आयोजित करीत असते या स्पर्धेत पारितोषिक प्राप्त संस्थेनी नाटक सादरीकरण केले होते त्या

दिग्दर्शकांचा सन्मान खालील प्रमाणे-
अमित इंगोले (रोटेशन – लेखक, प्रिती नौकरकर , स्कूल ऑफ स्कॉलर्स वर्धा) किशोर बत्तासे (जादुची थैली – लेखक, श्रीमती किमया विनायक नेरुसकर , रंगभुमी नागपूर) रजनी देशमुख (मोबाईल मोबाईल लेखक गोविंद गोडबोले ,स्कूल ऑफ स्कॉलर्स, वानाडोंगरी), उर्वशी डावरे (एक नवी पहाट , लेखक उर्वशी डावरे श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय) चिन्मय प्रविण देशकर , वाघाची पिल्ले लेखक,डॉ गणेश वडोदकर , देवरंजन बहुदेशिय संस्था, नागपूर), दुर्गा चेडे – ( रोटेशन , लेखक – प्रिती नौकरकर, श्री मंगल बहुउद्देशीय शिक्षण तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित मूकबधिर निवासी शाळा सावनेर जिल्हा नागपूर

१९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत पुरस्कार प्राप्त नाट्य संस्थेच्या व बालकलाकारांचा सत्कार-
प्रथम पारितोषिक : “खिडकी ” या नाटकात काम करणारी कलावंत : – तेजस्विनी ठवकर ,देवेश्री आंबोळे चैताली लुटे , मनश्री ठवकर, चैताली अस्वले, कार्तिक डोकरमारे ,तुषार हालमारे ,कर्तव्य आंबवणे ,भोला आंबोने , ब्राह्मणी शिक्षण प्रसारक मंडळ ब्राह्मणी, द्वितीय पारितोषिक :- “जादुगार” या नाटकातील कलावंत :- अद्वेत गुडदे, कलश पाठक गुंजन डेकाटे, हर्षवर्धन डोंगरे, शामला पेशकर ,अधिराज जाधव ,आयुष महंत ,तीर्थ पटेल , अन्वी परमार राष्ट्रभाषा परिवार सामाजीक सास्कृतीक मंडऴ, उत्कृष्ट्र अभिनया साठी रौप्यपदक देव नन्नावरे घायाळ पाखरा ,तेजस्विनी ठवकर

अभिनयाच्या गुणवत्तेसाठी प्रमाणपत्र-
इशिका भाजी (थेंबाचे टपाल ) , सेजल कावळे (रोटेशन) ,संस्कृती पंचवटी (वाघाची पिल्ले), दिव्यांशी मुरमाळे (घायाळ पाखरा), दिव्याश्री आंबोने (खिडकी ), राम काळकोंडे (कालीचा दास कालीदास), अंगद पाठक (जादूची थैली )
कौशिक गणेशे (आम्हालाही पंख हवे) , जीशांत मुरमाळे (होळी) ,वरद रामेकर (स्पेशल डिश)
बाल रंगभूमी परिषदेतर्फे रविवार दि. १९ मार्च रोजी झालेल्या नृत्य स्पर्धेचा निकाल (समन्वयक विलास कुबडे )
प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक , उत्तेजनार्थ प्रथम सर्टिफिकेट उत्तेजनार्थ द्वितीय सर्टिफिकेट
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय रहाटे, रोशन नंदवंशी, विलास कुबडे, अमोल निंबार्ते, योगेश राऊत, प्रशांत मंगदे, नितीन पात्रीकर, किशोर बत्तासे, किशोर डाऊ, डॉ अनिल कवडे यांनी परिश्रम घेतले.

………………………………………………

 

 

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या