Homeनागपूर न्यूजयुवकांमधील उद्यमशीलता विकसित झाली तर देश समृद्ध होईल: नितीन गडकरी

युवकांमधील उद्यमशीलता विकसित झाली तर देश समृद्ध होईल: नितीन गडकरी

युथ एम्पोवेरमेन्ट समिटचा समारोप : पाच हजार युवकांना थेट नोकरी

नागपूर,ता.१९. युवकांनी स्वतः मधील कौशल्य वापरून उद्योग जगतात पाऊल टाकावे, आपल्यातील उद्यमशीलतेचा विकास झाला तर देश समृद्ध होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचे जे स्वप्न पाहिले आहे ते साकार होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

फॉर्च्यून फाऊंडेशन, कौशल्य विकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युथ एम्पोवेरमेन्ट समिटच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर, माजी आमदार नागो गाणार, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रभाकर हरडे, माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, संदीप जाधव, विकास अधिकारी श्रीमती चहांदे, सारस्वत बँकेचे सुप्रीत दीक्षित, सोनाली शेंडे, भारतीय स्टेट बँकेचे सहायक महाव्यवस्थापक पुरुषोत्तम बहिरशेठ प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, रोजगाराच्या अनेक संधी चालून येत आहे. भविष्यातही अनेक रोजगार नागपूर आणि विदर्भातील युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. ३१ मार्चला इन्फोसिस ही कंपनी नागपुरात येत आहे, तिथे ५ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून अनेक स्वयंरोजगार तयार होतात आहे. कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर नावीन्य कल्पना वापरून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न सुरू आहे.

मी नव्याने एक प्रयोग सुरू करतो आहे प्लास्टिकपासून क्रूड पेट्रोल काढून ते डिझेलमध्ये टाकणार आणि ते डिझेल ट्रकमध्ये वापणार. या प्रकल्पात अडीच हजार कोटींची गुंतवणूक असून १५,००० रोजगार तयार होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तणसापासून डांबर निर्मितीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. ग्रामीण तरुणांना रोजगार कसा मिळेल ह्याचा विचार करण्यात यावा, असेही गडकरी यांनी सांगितले. नवं उद्योग करण्याचा कल्पना ही मागवून त्यावर विचार करावा, अशी सूचना गडकरी यांनी केली.

लोकसभा निवडणूकीपूर्वी एक लाख रोजगार देणार-

पुढील निवडणुकीपूर्वी मिहानमध्ये नागपूर व विदर्भातील युवकांना एक लाख रोजगार देणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना केली.

यावेळी स्वयंरोजगार करण्यात यशस्वी झालेल्या युवकांचा सत्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. स्वयंरोजगारसाठी कर्ज देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांना धनादेश चे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल सोले यांनी केले. संचालन योगेश बन, तर आभार प्रदर्शन गिरीश मुंदडा यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाल पडोळे, अशोक सायरे, अनिल देव, शैलेश ढोबळे, अक्षय पाटील, भोलानाथ सहारे, दीपक पवार, बबली मेश्राम, उदय पोफळी, योगेश पाचपोर, माया हाडे, रितू झगरघर, नलिनी वंजारी यांनी परिश्रम घेतले.

……………………………………..

Latest बातम्या