फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशिवा चौधरी यांच्या भक्तीगीतांच्या सादरीकरणातून भारावले ज्येष्ठ नागपूरकर

शिवा चौधरी यांच्या भक्तीगीतांच्या सादरीकरणातून भारावले ज्येष्ठ नागपूरकर

Advertisements

• खासदार ज्‍येष्‍ठ नागरिक सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा थाटात समारोप

• केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

नागपूर: युवा गायिका शिवा चौधरी यांच्या भक्तिगीतांच्या उर्जायुक्त सादरीकरणानाने खासदार ज्‍येष्‍ठ नागरिक सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा सुरेल समारोप झाला.

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समिती व ज्‍येष्‍ठ नागरिक प्रतिष्‍ठानच्‍या संयुक्‍तवतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्‍या खासदार ज्‍येष्‍ठ नागरिक सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे ३ ते ५ फेब्रुवरी २०२३ दरम्‍यान कविवर्ष सुरेश भट सभागृह येथे आयोजन करण्‍यात आले होते.

महोत्सवाच्या तिसऱ्या आणि समारोपाच्या दिवशी शिवा चौधरी यांच्या फ्युजन भक्ती गीतांच्या जादूने श्रोते भक्तिमय संगीतात न्हाऊन निघाले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गायिका शिवा चौधरी, माजी महापौर अनिल सोले, डॉ. राजू मिश्रा, जयप्रकाश गुप्ता, वसंतलाला शॉ, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त , अशोक मानकर, हरीश बाकरू, राजाभाऊ लोखंडे, राजेश बागडी आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मा.म.गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान आपला खडा आवाज आणि आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये शिवा यांनी ‘वक्रतुंड महाकाय’ ने कार्यक्रमाची सुरवात केली. त्यांनतर सुंदर अशी’ गणपतीजी गणेश नु मनाइये’ ही गणपती आराधना त्यांनी गायली. या दरम्यान त्यांनी श्रोत्यांना प्रत्येक गाण्यात सहभागी करून घेत त्यांच्याशी संवाद साधला. गुरूंचे महत्व सांगून ‘ गुरु ब्रह्मा गुरु विष्णू’ , ‘सारे तिरथ धाम आपके चरणों में’, ‘अरे द्वारपालो कन्हैया से कहदो’, ‘रघुपति राघव राजा राम’, ‘मतलब की इस दुनिया से’, ‘सासो की माला पे सिमरु मैं’ अशी भक्तिमय गाणी आणि कबीरांचे लोकप्रिय दोहे सादर केले.

तत्पूर्वी आपल्यासारख्या युवा कलाकाराला हा मंच प्रदान करून दिल्या बद्दल त्यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले.

सुरवातीला गायिका शिवा चौधरी आणि त्यांची चमू सुजॉय सिंग, योगेश कुमार, निशांत तोमर, जोसेफ युवान , केतन कुमार या मंडळींचा सत्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. संजय उगेमुगे यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या अविरत सेवेसाठी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अभिजित मुळे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि मार्गदर्शक दत्ता मेघे, ईतर ट्रस्टी सर्वश्री अविनाश घुशे, अशोक मानकर, सुधाकर कोहळे, नंदाताई जिचकार, प्रतापसिंह चव्हाण, प्रभाकर येवले, महमूद अंसारी, बाळ कुळकर्णी, निलेश खांडेकर, कमलेश राठी, गौरीशंकर पाराशर, राजेश बागडी, सारंग गडकरी, भोलानाथ साहारे, , संजय गुळकरी, सुधीर शर्मा, जयप्रकाश गुप्ता,मधुप पांडे, पिंटू कायरकर, आशिष वांदिले, रेणुकाताई देशकर, किशोर पाटील, संदीप गवई, हाजी अब्दुल कादिर, दिलीप जाधव, ॲड नितिन तेलगोटे, विलास त्रिवेदी आणि मनिषा काशीकर, आदींनी विशेष प्रयत्न केले.

ज्येष्ठ नागरिक महोत्सव यशस्वी: नितीन गडकरी

 गडकरी यांनी जेष्ठ नागरिकांसाठी महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे तसेच जेष्ठ नागरिकांनी या महोत्सवाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याबद्दल आणि यशस्वी केल्या बद्दल जेष्ठ नागरिकांचे आभार मानले. जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान च्या वतीने नागपूरात आतापर्यंत ४८ हजार जेष्ठ नागरिकांना हेल्थ कार्डचा लाभ देण्यात आला असून जेष्ठ नागरिकांसाठी पर्यटनासाठी ग्रीन बसेस निशुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. २४ हजार ६०० जेष्ठ नागरिकांनी याचा फायदा घेतला आहे . नागपूरात विरंगुळा केंद्र, क्रीडा स्पर्धा सह जेष्ठ नागरिकांसाठी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविल्या जात आहे. आपल्या निमंत्रणाला मान देऊन शिवा आणि त्यांची चमू नागपूरकर श्रोत्यांसाठी आल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

ज्येष्ठ नागरिकांनी भक्तिमय गीतांवर धरला ठेका-
शिवा चौधरी यांच्या गीतांवर अनेक ज्येष्ठ नागरिक ठेका धरताना दिसून आले. प्रयेक गीताला नागरिकांनी टाळ्या वाजवून गायक मंडळीला प्रोत्साहित करत आनंद लुटला. वेगळ्या शैलीचे भक्तीगीत आणि त्याच्या जोडीला ऊर्जायुक्त वाद्यवृंद यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या