
शहर काॅग्रेस कमेटीची बैठक संपन्न
नागपूर: दि.१७ जानेवरी २०२३: अ.भा.काॅग्रेस कमिटीच्या वतीने भारत जोडो यात्रा नंतर राष्ट्रिय पातळीवर ”हाथ से हात जोडो अभियान” राबविण्याचा ठराव नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमेटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार नागपूर शहर जिल्हा काॅग्रेस कमेटीची बैठक शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली माजी केद्रिय मंत्री विलासराव मुत्तेमवार,सोशल मिडिया अध्यक्ष विशाल मुत्तेमवार,प्रधान महासचिव डाॅ.गजराज हटेवार,प्रा.दिनेश बानाबाकोडे,पुरुषोत्तम हजारे यांच्या प्रमुख उपस्थित देवडिया काॅग्रेस भवन येथे पार पडली. बैठकीमध्ये सर्वप्रथम प्रधान महासचिव यांनी मागील सभेचा अहवाल वाचुन दाखवला व सर्वसम्मतीने मंजूरी प्रदान केला.
शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी हात से हात जोडो अभियांनाची सुरुवात ब्लाॅक व प्रभाग निहाय राबवायच्या आहे अशा सुचना दिल्या.संपूर्ण कार्यक्रम २३ जानेवारी पासुन प्रारंभ करुन मार्च-२०२३ पर्यत कार्यक्रम राबविण्यात येईल तसेच उपरोक्त कार्यक्रमामध्ये नागरिकांना बेरोजगारी,शेतमजूर,छोटे व्यापारी समस्या व धर्माध शक्तीचा बिमोड करण्यासाठी ब्लाॅक अध्यक्षांनी ब्लाॅकमधिल प्रमुख ज्येष्ठ व श्रेष्ठ आमदार,माजी खासदार,लोकप्रतिनीधी,नगरसेवक,से
ब्लाॅक अध्यक्षांनी कुठल्याही प्रकारच्या गटबाजीचा विचार न करता सर्वाना सहभागी करुन घ्यावे.जे ब्लाॅक अध्यक्ष अनुपस्थित राहले त्याच्या जागी नव्या नावांचा विचार देखील करण्याचे ठरविले. सेलच्या अध्यक्षांवर देखिल निरिक्षक नेमून त्यांच्या कार्याचा आढावा शहर काॅग्रेस कमेटीने वारंवार घ्यावा.सक्रिय नसलेल्या सेलच्या अध्यक्षस्थानी दूसरी नियुक्ती करावी.
माजी केद्रिय मंत्री विलासराव मुत्तेमवार यांनी संबोधित करतांना सांगितले की,इतर पक्ष सत्तेत असून देखिल वारंवार कार्यक्रम राबवित असतात.परंतू काॅग्रेसचा पदाधिकारी बदलायला तयार नाही,अशी कानटोचनी देखील त्यांनी केली.भाजपानी अनेक खोटी आश्वासने दिली.बेरोजगारी असो,नोटबंदी असो,पेट्रोल गॅस असो अशा अनेक बाबींवर काॅग्रेसच्या पदाधिका-यांनी चर्चा करावी.आज मध्यमवर्गीयांना महिन्याच्या शेवटी पैशाचा ताळमेळ करने कठिन झाले आहे.त्यांच्या पाठिशी काॅग्रेसचा कार्यकर्ता गंभीरतेपणे उभा असलाच पाहिजे.मंदीर,मस्जींद, असा वाद वारंवार निर्माण करुन लोकांमध्ये सभ्रम निर्माण करण्याचे काम करीत असतात.
विशाल मुत्तेमवार यांनी सांगितले की, ब्लाॅक अध्यक्षाजवळ पत्रक व स्टिकर रुपात साहित्य प्रदेश काॅगे्रस व शहर काॅग्रेसच्या माध्यमातुन दिल्या जाईल जेणे करुन लोकांपर्यत आपल्याला विषय पोहचवता येईल.
हाथ से हात अभियानाकरीता १८ ही ब्लाॅक वर निरिक्षकांची नियुक्ति केली आहे. त्यांच्या मार्फतच कार्यक्रम घ्यावा.व निरिक्षकांनी ब्लाॅक अध्यक्षांचा कार्याचा अहवाल शहर काॅग्रेस कमेटीला सादर करावा.
बैठकीमध्ये उमेश शाहू,अतीक मलीक,रमन पैगवार,अरुण डवरे,रवि गाडगे पाटिल,राजु महाजन,प्रविण सांदेकर,सरफराज खान,दयाल जशनानी,वासुदेव ढोके,डाॅ.सुधिर आघाव,राजेश कंुभलकर,जाॅन थाॅमस,किशोर दहीवले,सुनिल दहीकर,अॅड.अभय रणदिवे,रिमा चव्हाण,डाॅ.सतीश पारेख,प्रशांत पाटिल,राजेश ढेगे,अशोक निखाडे,अनिता ठेगरे,आशा शेदरे, महेश श्रीवास,आप्पा मोहिते, ज्ञानेश्वर ठाकरे,प्रविण गवरे,विश्वेश्वर अहिरकर,दिनेश तराळे,पंकज थोरात,पंकज निघोट,देवेद्र रोटेले,प्रमोदसिंग ठाकुर,सुरज आवळे,ईरशाद मलीक,सुनिता ढोले,मोतीराम मोहाडीकर,अब्दुल शकील,गोपाल पटटम, शुभम आमदरे,युगल विदावत,राहुल मोरे,अनिरुध्द पांडे, प्रा.मनोहर तांबुलकर,किशोर गीद,अब्दुल नियाज नाजू,राज खत्री,लंकेश उके,सुनिल पाटिल,रमेश राऊत,भोला कुंचनकर,अतीक कुरैशी,नरेश शिरमवार,मन्सूर अख्तर,तौषिक अहमद,केशव धावडे,मनोज चवरे,नागेश राऊत,संजय भिलकर,वैभव काळे,अजय नासरे,आशा उईके ,जावेद खान,प्रकाश वानखेडे,कुमार बावनकर सहित पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा