
चंद्रपूर,२ जानेवरी २०२३ : भारतीय जनता पक्षाच्या ’मिशन १४४’च्या दुस-या टप्प्याची सुरवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज विदर्भातील चंद्रपूर येथून केली.मागील लोकसभेत ज्या जागांवर भाजपचा पराभव झाला त्या मतदारसंघात पहील्या टप्प्यात केंद्रिय मंत्र्यांचे दौरे आटाेपले असून, दुस-या टप्प्यात भाजपचे प्रमुख नेते या मतदारसंघांचे दौरे करीत आहेत.महाराष्ट्रातील १६ मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले असून चंद्रपूर येथून काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी झाले आहेत.त्यामुळेच नड्डा यांनी २०२४ ची अगामी लोकसभेच्या निवडणूकीची रणनीती आखित चंद्रपूर गाठले मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या एवढ्या महत्वपूर्ण दौ-यात अनुपस्थितीमुळे चंद्रपूरसह विदर्भात चर्चेला उधाण आले होते.
मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपल्या भाषणात फडणवीस सभेला न येण्याचे कारण सांगितले. (Due to deterioration of health Devendra Fadnavis absent from J. P. Nadda’s Sabha)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते चंद्रपूरमधील नड्डा यांच्या सभेला अनुपस्थित होते, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती रविवारी रात्री एकच्या सुमारास अचानक बिघडली. त्यांची प्रकृती सभेला येण्यालायक नाही, त्यामुळे ते पक्षाचे अध्यक्ष नड्डा यांच्या सभेला येऊ शकले नाहीत.
चंद्रपूरमधील सभेला फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. फडणवीस यांनी चंद्रपूरमधील सभेला येण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांचे तापमान हे १०३ डिग्रीपर्यंत गेले, त्यामुळे ते नड्डा यांच्या सभेला येऊ शकले नाहीत. त्यांनी तशी विनंती करून क्षमाही मागितली आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाकडून मिशन लोकसभा सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी ‘लोकसभा प्रवास योजना’ जाहीर करण्यात आली आहे. त्याअंतर्गत नड्डा हे चंद्रपूरमध्ये आले होते. नड्डा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री रावसाहेब दानवे यांसारखे दिग्गज नेते असतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, फडणवीसांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. मात्र, बावनकुळे यांनी फडणवीस सभेला न येण्याचे कारण आपल्या भाषणातून सांगितले, त्यामुळे फडणवीस यांच्या अनुपस्थितीमुळे रंगलेली चर्चाही आता थांबली आहे

आमचे चॅनल subscribe करा