फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइममोदींच्या वाहतूक व्यवस्थेतील वर्दीधारी म्हणाला.. वीस ही बायांसोबत हॉटेलात जाऊन.....!

मोदींच्या वाहतूक व्यवस्थेतील वर्दीधारी म्हणाला.. वीस ही बायांसोबत हॉटेलात जाऊन…..!

Advertisements

वयोवृद्ध वाहनचालकाचे आरोग्य बिघडले

विंगर गाडीतील मोदींच्या श्रोत्या महिलांचे असे ही धाडस: वर्दीधा-याचे काढले फाटो आणि व्हिडीयो

‘तो ’म्हणाला नाना पटोलेंकडे चल!

पुरुष शरीरावर बलात्कार करतात,या वर्दीधा-याने आत्मसन्मानावर बलात्कार केला:महिलांचा संताप

आम्ही पहील्याच्या स्त्रिया नाही,अस्मितेचे भान असणा-या आजच्या काळातील स्त्रिया आहोत:वर्धीधारकाला महिलांची तंबी

नागपूर,ता.१२ डिसेंबर २०२२: वंचित-उपेक्ष्च्यातांच्या विकासाला अग्रक्रमाने प्राधान्य दिले जाईल,केंद्र सरकार निर्माण करीत असलेल्या पायाभूत सुविधांना ‘मानवी’ चेहरा दिला जाईल,वगैरे वगैरे बरेच काही या देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी, मिहान येथे काल, ७५ हजार काेटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण-भूमिपूजन करताना बोलून गेलेत,मात्र त्यांचे शब्द हवेत विरण्यापूर्वीच, या शहरातील वीस सामान्य वर्गातील महिलांच्या आत्मसन्मानचे व एका वयोवृद्ध वाहन चालकाच्या स्वाभिमानाची अक्षर: लक्तरे, एक सरकारी नोकर असणा-या वर्दीधारकानेच उडवल्याची अतिशय दूर्देवी घटना, मोदींचे भाषण ऐकून परतताना महिलांसोबत घडली.

नेहमीच महिलांच्या सशक्तीकरणाविषयी,आत्मनिर्भरतेविषयी बोलणारे मोदीजी यांचे साक्षात दर्शन घेण्यासाठी व त्यांचे उस्फूर्त,ज्वलंत,स्फूर्तीदायी भाषण ऐकण्यासाठी नागपूरातील प्रभाग क्रमांक २६ मधून वीस महिलांचा समूह विंगर वाहनातून कार्यक्रमस्थळी पाेहोचला .कार्यक्रमानंतर मात्र,वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा,ट्राफिक जाम,मिळेल त्या मोकळ्या स्थानावरुन गाड्या गर्दीतून बाहेर काढणे,या सर्व उपदव्यापामुळे विंगरच्या चालकाने देखील चूकून उलट दिशेने गाडी दामटली.

मात्र, शहरात परत येण्या ऐवजी बुटीबोरीकडे उलट दिशेने जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.खापरीकडील हायवे वरुन ते उलट दिशेने खाली उतरले होते.बुटीबोरीला लागून असलेला यू-टर्न त्यांनी घेतला व जामठावरुन पुन्हा मिहानकडे येण्यासाठी पुन्हा यू-टर्न घेतला,तिथे समोर सिग्नल होता.सिग्नलवर थांबलो असता अगदी फूटपाथला लागून या वर्दीधारी वाहतूक पोलिसाची दूचाकी देखील सोबत होती.विंगर व या दूचाकीच्या मधले अंतर अगदीच कमी असल्याने या वर्दीधारकाचा संताप अनावर झाला.

हा वर्दीधारी कदाचित नशेत होता,त्याने लगेच शिविगाळ करण्यास सुरवात केली.आम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न ही केला मात्र तो वर्दीधारी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.आमचे वाहनचालक हक वयस्कर होते,ते पार घाबरुन गेले.त्यांचा रक्तदाब वाढला.त्यांच्या मदतीसाठी आम्ही महिला पुढे सरसावलो.मात्र,त्या वर्दीधारकाने महिलांचा देखील सन्मान नाही राखला.

तो बुजुर्ग माणूस आहे,त्याला माफ करुन द्या,आम्ही तुमची माफी मागतो,अश्‍या विणवण्या वाहनातील महिलांनी वर्दीधारकाला केली मात्र,’तुह्या मायले…..’यापेक्षा ही ‘गंदी’ शिविगाळ करीत असल्याचे,वाहनातील महिलांनी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना सांगितले.

आम्ही मग आमदार कृष्णा खाेपडे यांना फोन लावला,कृष्णा भाऊ म्हणाले,दे त्या वर्दीधारकाला फोन दे तर,‘कोण कृष्णा खोपडे?मी कोण्या कृष्णा वृष्णाला नाही ओळखत!आमदार असेन घरचा मी कोणाला गिनत नाही,तू माझ्यासोबत नाना पटोलेकडे चल….!’असे तो वर्दीधारक वाहनातील एका लढवय्या स्वभावाच्या स्त्रीला म्हणाला.ही घटना काल दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

मी कशाला येऊ,अशी ती महिला भडकली.तो आमदाराला गिनून नाही राहीला आम्हाला काय गिनणार!त्याने आम्हाले समोर नाही जाऊ दिले,त्याची गाडी आमच्या वाहनासमोर आडवी लावली.खूप घाणेरड्या शिव्या देत होता,ऐकणे ही होत नव्हते,शेवटी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना फोन लावला.पण,त्याने वाहनचालकाजवळील आसनावर बसलेल्या दोन्ही महिलांना उतरवले व स्वत: वाहनाच्या आत येऊन बसला.

तुही गाडी जप्त करतो,असे वाहनचालकाला दमदाटी करीत होता,त्या वयस्कर माणसाचे हातपाय थरथर कापत होते,ते सारखे सारखे त्या वर्दीधारकाची माफी मागत होते,तुमच्या पाया पडतो,अशी विनवणी करीत होते.तरी देखील ‘नंगाड’भाषेत तो शिवीगाळ करीत राहीला.मग युवा मोर्चाचे कार्यकर्तेही जमले.गर्दी ही जमली.

त्याने आमच्या रक्षणासाठी संविधानाची शपथ घेतली,तरीही तो आम्हा महिलांसोबत असा वागला!लोक शरीराचा बलात्कार करतात,त्याने तर आमच्या आत्मसन्मानाचा बलात्कार केला!त्या वयस्कर वाहनचालक काकाजींना म्हणाला,तू या सर्व बायकांना घेऊन हॉटेलात जाऊन…..!रस्त्यावर जाऊन….!ही असली भाषा त्या वर्दीधारकाने वापरली,हा आमच्या आत्मसन्मानावरचा बलात्कार नाही का?

रमणा मारोती येथे राहणारे ‘झोडे’नावाचे ते काकाजी अटॅक आल्यासारखे वागत होते.ते खूपच घाबरले होते.पण आम्ही नाही घाबरलो,आम्ही आजच्या काळातल्या स्त्रिया आहोत,तो काय आम्हाला पहील्याच्या काळातल्या बाया समजला का?पहील्याच्या बायका ‘चूल आणि मूल ’च सांभाळत होत्या,आम्हाला आमच्या सन्मानाचं भान आहे.

इतक्यात दोन वर्दीधारी आणखी आले,त्यांनी त्या बेवड्याला बाजूला घेऊन गेलेत,आमची माफी ही मागितली, मग आमचे वाहन तिथून निघाले पण?आमचं शरीर,आमचा स्वाभिमान,आमची अस्मिता ‘बाई’ म्हणून टाचेखाली चिरडणा-या व त्या काकाजींना आमच्यासोबत जाऊन…म्हणणा-या त्या वर्दीधारकाचा आम्ही आधी फोटो काढला,त्याच्या बाईकचा फोटो काढला,मगच तिथून निघालो…….!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या