

नागपूर,दि.९ डिसेंबर २०२२: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ११ डिसेंबर रोजी शहरात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच राज्यपाल, मुख्यमंत्री आदी अती महत्वाचे व्यक्तींचे शहरात आगमन होणार आहे. त्यानुषंगाने शहरातील मार्गावर सूरक्षेच्या दृष्टीकोणातून वाहतूकीचे दृष्टीने विविध ठिकाणी बैरीकेडींग करून वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात येणार असून वाहतूकीवर निर्बंध घालण्याकरीता अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
वाहतूकीस अडथळा निर्माण होऊ नये तसेच सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये व वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी शहर पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत याप्रमाणे आदेश पारीत करण्यात आले आहे.
अतिमहत्वाचे व्यक्तीचे नागपूर दौरा प्रसंगी वाहतूक व्यवस्था याप्रमाणे राहील. विमानतळाकडे जाणाऱ्या रोडवर यादरम्यान गर्दी राहील. या मार्गावर सकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. नागपूर रेल्वेकडे जाण्यासाठी प्रवाश्यांनी सत्रा मार्केट मार्गाचा वापर करावा.
अमरावती मार्गे वर्धा करिता व जबलपूर मार्गे अमरावतीकडे जाणाऱ्या सर्व जड वाहनांसाठी झिरो पॉईन्ट ते समृद्धी महामार्ग (वायफळ टोल प्लाझा) हिंगणा गावाकडून झिरो पॉईन्टकडे येणारा मार्ग संपूर्ण वाहतूकीस बंद राहील.
अमरावती मार्गावरून वर्धेकडे जाणारी वाहतूक ही मोंढा फाटा येथून उजवे वळण घेवून कान्होलीबारा मार्गे बुटीबोरी मार्गाचा वापर करतील.
अमरावती मार्गे जबलपूर जाणारी वाहतूक व भंडारा मार्गे वर्धा, अमरावतीकडे जाणारी वाहतूक पारडी चौक, ऑटोमोटीव्ह चौक, मानकापूर चौक, नवीन काटोल नाका चौक, दामा टि पॉईन्ट, वाडी टि पॉईन्ट, अमरावती रोड या मार्गाचा वापर करतील.
वर्धा मार्गे नागपूर शहरात येणारी वाहतूक ही बुटीबोरी येथून वळविण्यात येईल. मान्यवरांच्या बंदोबस्तातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्याचे व थांबविण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे.
**




आमचे चॅनल subscribe करा
