फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजगुरुमंदिरात दत्त जयंतीनिमित्त पालखी सोहळा

गुरुमंदिरात दत्त जयंतीनिमित्त पालखी सोहळा

Advertisements

नागपूर, ५ डिसेंबर: श्री गुरुमंदिर जयप्रकाशनर येथे दत्तजयंतीदिनी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात ७ डिसेंबर रोजी सकाळी ६ वा. पालखी सोहळा, ७ ते ९.३० वा. दरम्यान पंचसूक्त पवमान अभिषेक आणि रुद्राभिषेक, सकाळी ११.३० वा. दत्तजन्म सोहळा, सायंकाळी ५.३० वा. बालकीर्तनकार अमोघ अमर देशपांडे यांचे दत्तजन्माचे कीर्तन होईल. तसेच सायंकाळी ७ वा. सदगुरुदास महाराज यांचे नवरात्र समारोपीय अभंग निरुपण होणार आहे.

त्याचप्रमाणे ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. अमरावतीचे डॉ. रमेशपंत गोडबोले व सहकाèयांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. ७ डिसेंबर रोजी सकाळी ६ वा. पालखी मिरवणूक श्री गुरुमंदिरातून निघणार आहे.

या नगरप्रदक्षिणेदरम्यान मार्गातील भाविकांनी आपल्या घरापुढे सडा, रांगोळी काढून पालखीचे स्वागत करावे, सहकुटुंब पालखी मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या पालखी मिरवणुकीचा मार्ग श्रीगुरुमंदिरापासून प्रारंभ, एसबीआय तपोवन, गजानन महाराज मंदिर, धरमपेठ सोसायटीची अंतिम गल्ली, महालक्ष्मी मंदिर, श्रीराम मंदिर व परत गुरुमंदिर असा राहणार आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या