Homeनागपूर न्यूजडॉक्टर गोवरच्या संक्रमणाला कसे थांबावयचे?

डॉक्टर गोवरच्या संक्रमणाला कसे थांबावयचे?

प्रेस क्लब येथे पत्रकार कुटूंबियांसाठीच्या आरोग्य रोगनिदान शिबिरात डॉक्टरांनी केले अनेकविध शंकांचे समाधान

आरोग्य शिबिराला पत्रकारांचा भरघोस प्रतिसाद

नागपूर,ता.४ डिसेंबर २०२२: आरोग्याचा तंत्रशुद्ध व तार्कीक अर्थ म्हणजे जेव्हा शरीर,मन आणि समाज हे तीनही व्यवस्थित असतात,काेणताही रोग,आजार किवा वेदना नसतात,आपली नेहमीची कामे नीट,व्यवस्थित पार पडतात,शरीर निरोगी,मनाची उभारी उत्तम असते,शरीर धडधाकट व मनाची अवस्था भक्कम असते व ज्यामुळे आनंदी व सुखी जीवन जगणे शक्य असतं,त्याला आरोग्य असे म्हणता येईल.स्थूल मानाने आरोग्य म्हणजे शारीरिक,मानसिक व सामाजिक संतुलनाची स्थिती हे.आरोग्यास असंतुलन निर्माण झाल्यास शरीराला विविध रोग जडतात,अश्‍या वेळी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका सुव्यवस्थितपणे पार पाडण्यास शारीरिक,मानसिक दृष्टया सक्षम नसते,त्यामुळे कार्यात्मक योग्यतेचा देखील -हास होतो,यावरुन कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात ‘आरोग्य’ही संकल्पना किती महत्वाची असते हे ठलकपणे अधोरेखित होतं.

सुदृढ आरोग्याच्या याच महत्तीची गरज समाजातील इतर सर्व घटकांप्रमाणेच पत्रकारांना देखील असते,याच दृष्टिकाेणातून आज रविवार दिनांक ४ डिसेंबर रोजी प्रेस कल्ब येथे भारतीय जनता पक्ष,नागपूर महानगरतर्फे पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांसाठी भव्य आरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला पत्रकार वर्गानी भरघोस प्रतिसाद दिला.सकाळी ९ ते दुपारी २ वा.दरम्यान नागपूर शहरातील विविध अवयवतज्ज्ञांची व सुप्रसिद्ध निष्णात डॉक्टरांची मांदियाळी पत्रकारांच्या आरोग्यासाठी प्रेस क्लबच्या विविध तंबूत उपस्थित होती.

पदमश्री डॉ विकास महात्मे नेत्ररोगतज्ज्ञ,अधिष्ठाता डॉ. राज गजभिये जनरल/लप शल्यक्रिया तज्ज्ञ,अधिष्ठाता मेडिकल कॉलेज नागपुर अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर.अधिष्ठाता डेंटल कालेज(दांत विशेषज्ञ)
डॉ. प्रमोद मूंदडा ,कार्डियोलाजिस्ट विशेषज्ञ(प्लेटिना हॉस्पिटल),डॉ. प्रमोद गांधी,इंडोक्रनोलाजीस्ट डॉ. दीपक जेसवानी जनरल फिजिशीयन, चेस्ट,इंडोक्रनोलाजीस्ट डायरेक्टर क्रिटीकल केयर, डॉ. चैतन्य शेम्बेकर’स्त्रीरोगतज्ज्ञ. ,,डॉ. देवेंद्र माहुरे, ईएनटी मेडिकल कॉलेज,डॉ. सुहास साल्पेकर, यूरोलॉजिस्ट (यूरिन)विशेषज्ञ डॉ. आशीष बदकल, सीवीटीएस(हार्ट सर्जन, डॉ. निखिल पांडे, मानसोपचारतज्ज्ञ, डॉ. प्राची माटे त्वचारोगतज्ज्ञ,डॉ. पराग राऊत, आर्थो (हाडे) विशेषज्ञ ,राऊत नर्सिंग होम ,डॉ. गिरीश चरडे, नेल्सन टीम, पेडीएट्रीशियन (चाइल्ड) विशेषज्ञ, डॉ. राजेश मुरकुटे, होम्योपैथिक विशेषज्ञ, डॉ. अजय सारंगपूरे, डॉ. श्रींरंग वरहाड़पांडे, डॉ. कोमल काशीकर, आयुर्वेदिक विशेषज्ञ, डॉ. माधुरी इंदुरकर, नेचरोपेथी विशेषज्ञ, डॉ. संजय राजहंस फिजियोथेरेफी विशेषज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टर मंडळीने आज पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांच्या आरोग्याची तपासणी केली व अनेक शंकांचे समाधान केले.सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.उदय बोधनकर यांची विशेष उपस्थिती होती.

सुरवातीला पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी फित कापून आरोग्य शिबिराचे उद् घाटन केले.

ह्वेद पाठक या अवघ्या चार महिन्याच्या चिमुकल्याच्या डोळ्यातून वारंवर पाणी गळत होतं.त्याला तपासणीसाठी आणले असता सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.चरडे यांनी एका वर्षापर्यंत नवजात शिशुंच्या डोळ्यांच्या ग्रंथी या पूर्णपणे सक्षम होत नसतात असे सांगितले.त्यामुळे डोळ्यातून सातत्याने पाणी गळत असतं,याच काळजी करण्यासारखे काहीही नसून फक्त नाकाला दररोज विशिष्टप्रकारे मसाज केल्याने समस्या सूटू शकते असे त्यांनी सांगितले. याशिवाय कापूस कोमट पाण्यात भिजवून दिवसांतून तीनचार वेळा बाळाचे डोळे पुसण्याचा देखील सल्ला त्यांनी दिला.

एवढ्या अल्पशा समस्येसाठी बाळाला तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेण्यासाठी बाळाचे पालक रचना पाठक व सागर पाठक हे विचारात पडले असताना,आज प्रेस क्लब येथे आयोजित या रोगनिदान शिबिरातून पालक म्हणून समाधान घेऊन ते बाहेर पडले.

याशिवाय अनेक पालकांनी डॉक्टरांना वाढत्या गोवर राेगा संबंधीचे अनेक प्रश्‍न विचारत समाधान करुन घेतले. लहान मुलांमध्ये गोवरच्या संक्रमणाला कसे थांबवायचे?याबाबत डॉ.चरडे यांनी पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.गोवरची प्राथमिक लक्षणे काय असतात,सर्दी,खोकला,ताप,डेंग्यू बद्दल मोलाची माहिती उपस्थित पत्रकारांनी व त्यांच्या कुटूंबियांनी जाणून घेतली.

डॉ.प्रमोद मुंदडा यांनी ह्दयघात(हार्टअटॅक) संबंधी अत्यंत मोलाची माहिती पत्रकारांना दिली.पत्रकारांचे जीवन हे तानतनावानेच भारलेले असते,कामाचा ताण व तनावामुळे ह्दयावर होणारे विपरित परिणाम,कामामुळे शिस्तबद्ध नसणारी पत्रकारांची जीवनशैली, यातून निर्माण होणा-या ह्दयासंबंधीच्या समस्या,ह्दयवाहिन्यांची उघडझाप,बंद होणे,ईसीजीची गरज व महत्व इत्यादी विषयी डॉ.मुंदडा यांनी मोलाची माहीती दिली तसेच अनेकांची तपासणी ही केली.

याशिवाय दांतांवर मोफत उपचाराचा लाभ अनेक पत्रकारांनी व त्यांच्या कुटूंबियांनी घेतला.या ठिकाणी दातांवर उपचार करण्यासाठी तंत्रसामुग्रीने युक्त व्हॅनच प्रेस क्लबच्या परिसरात उभी होती.दातांच्या तपासणीसोबतच अनेकांचे रुट कॅनल देखील या व्हॅनमध्येच मोफत करण्यात आले.

अनेकांनी मोफत औषधांचा देखील लाभ घेतला.निर्सगोपचराचे फायदे डॉ.माधुरी इंदूरकर यांनी अधोरेखित केले.स्वस्थ केसांसाठीचे उपचार यावर देखील प्रकाश टाकला.कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तीमत्व हे स्वस्थ व निरोगी केसांवरुनच खुलत असंत,त्यामुळे शरीरातील इतर अवयवांप्रमाणे केस हे देखील तितकेच महत्वाचे असून निरोगी केसांसाठीचे विविध उपाय त्यांनी रोगनिदान शिबिरात सांगितले.तानतनावमुक्त जीवनशैली,मधुमेह व उच्च रक्तदाब याविषयी मोलाची माहिती दिली.

डॉ.कृष्णा पांडे यांनी डोळ्यातील चषम्याविषयी शास्त्रशुद्ध माहिती प्रदान केली.चष्मा कधी,कोणत्या वयात घालायचा,उत्तम लेंसेस कशी असतात इत्यादी बाबत ज्ञानप्रबोधन करणारी माहिती दिली.डॉ.मुरकुटे यांनी इम्यूनिटीविषयी सखोल माहिती प्रदान केली.तब्बल दोन वर्षे करोनासाख्या जागतिक महामारीमुळे मानवाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचे महत्व ठलकपणे अधोरेखित झाले,अशी ही रोगप्रतिकारक शक्ती कश्‍यामुळे तयार होते,त्याचे महत्व काय इत्यादीबाबत डॉ.मुरकुटे यांनी मोलाची माहिती प्रदान केली.

डॉ.सुहास साल्पेकर यांनी मूतखडा,पुरुषग्रंथी,जननेंद्रिय,किडनी इत्यादी माणसाच्या महत्वपूर्ण अवयव व रोगाबाबत सखोल माहिती दिली व उपचारांची ओळख करुन दिली.वयाच्या पन्नाशीनंतर पुरुषग्रंथी या हळूहळू आकंुचन पावतात,यामुळे कोणकोणते शारीरिक बदल होतात,कोणकोणता त्रास उद् भवू शकतो,शुक्राणूविषयीची देखील मोलाची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

डॉ.रश्‍मी शुक्ला यांनी आई व बाळाचे अतुट नाते विशद करीत,नवजात बालकांच्या आईने कश्‍याप्रकारे आरोग्याची काळजी घ्यावी,याची सखोल माहिती दिली. आईला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून लांब राहण्याचे महत्वपूर्ण टिप्स त्यांनी दिले.हळदीचे दूध हे कोणत्याही वयात अतिशय आरोग्यदायी असल्याचे त्यांनी सांगितले.बालकांना कधीही पंख्याच्या थेट वा-यात ठेऊ नये कारण त्यांची त्वचा ही अतिशय संवेदनशील असते,याशिवाय बालकांच्या चेह-याला नेहमीच रॅप करुन ठेवावे,मोठ्यांना ज्याप्रमाणे चेह-याला बांधून ठेवण्याची गरज भासते,त्यापेक्षा अधिक लहान मुलांना याची गरज असल्याचे त्या सांगतात.एक्सपोजर टाळावे.बाळांना किमान सहा महिन्यांपर्यंत तरी आपण जेवढे शरिराला कव्हर करतो त्यापेक्षा एक लेअर जास्त कव्हर करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.चैतन्य शेंबेकर यांच्या अधीनस्थ डॉक्टर चमूने स्त्रियांचा मोनोपॉज,गर्भाशयसंबधी च्या समस्या,संततीप्राप्तीला उशिर होण्याची महत्वाची कारणे, दोष,उपाय,लॅप्रोस्कॉपी इत्यादीविषयी मोलाची माहिती प्रदान केली.

याशिवाय बीएमडी,ईसीजी,पीएफटी,ऑटोस्काफी, उच्च रक्तदाब,मधुमेह, एलएफटी,केएफटी, सिबिसी, टीएचएस,लिपिड प्रोफ़ाइल, एचबीए1सी,केल्शियम इत्यादीबाबत देखील विचारणा व तपासणी पार पडली.

रोगनिदान शिबिरात उपस्थित सर्व तज्ज्ञ डॉक्टर मंडळींनी आज आपला मोलाचा वेळ काढून पत्रकार मंडळी व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याला समर्पित केला,यासाठी अनेक पत्रकारांनी त्यांचे व्यक्तीश:आभार मानले.

याप्रसंगी भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके,संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर,संजय भेंडे,संजय बंगाले,चंदन गोस्वामी यांच्यासह प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र,शिरीष बोरकर,माहिती अधिकार आयुक्त राहूल पांडे आदी उपस्थित होते.

Latest बातम्या