
आंबेडकरी जनतेचे संविधान चौकात लक्षवेधी उपोषण
२० डिसेंबरला धडक मोर्चाचा इशारा
नागपूर,ता.२ डिसेंबर २०२२: डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या (अंबाझरी) त्वरित निर्मिती साठी व दोषींना अटक करा या मागणीसाठी संविधान चॊकात ‘लक्षवेधी’उपोषण करण्यात आले. याप्रसंगी आमदार विकास ठाकरे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार डाॅ.अभिजित वंजारी यांनी संविधान चौकात आंदोलन स्थली उपस्थित राहून आंदोलनाल पुर्ण पठींबा जाहीर केला. आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विषयावर विधानसभेत सरकारला जाब विचारणार, असे आमदार विकास ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले.
स्थानिक राजकीय पुढा-यांनी भु- माफीयांना हाताशी घरुन आर्थिक फायद्या साठी अंबाझरीस्थित डाॅ. आंबेडकर स्मारक उध्वस्त करुन आंबेडकरी जनतेच्या अस्मितेला आव्हान दिले आहे. ठेकेदाराला अटक करुन २० एकर जागेवर डाॅ. आंबेडकर स्मारक बनवण्यात यावे. या मागणी साठी आंबेडकरी जनतेनी गेल्या दोन वर्षांपासून आंदोलनाचा मार्ग अवलंबिला आहे.

संविधान चौकातून लोकशाहीच्या मार्गाने सुरवात झालेल्या आंदोलनाची आज दुस-या टप्याची सुरवात करण्यात आली.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा संविधान चौक येथे लक्षवेधी-उपोषणाला सुरवात करण्यात आली.
या प्रसंगी शासनाला इशारा देण्यात आला. वेळीच योग्य दखल घ्या. आंबेडकरी जनतेच्या भावनेचा आदर करा. अन्यथा भविष्यात हे आंदोलन, जन-आंदोलनात रुपांतरीत झाल्या शिवाय राहणार नाही. आंदोलनाच्या निमित्ताने हा इशारा देण्यात आला.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (अंबाझरी) बचाव कुती समितिच्या बॅनर खाली २ डिसेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत संविधान चौक नागपुर येथे लक्षवेधी- उपोषण करण्यात येणार आहेत.
शासनाने दुर्लक्ष केल्यास नागपुर विधान सभेवर २० डिसेंबरला धड़क मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
किशोर गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितित डाॅ.धनराज डहाट, बाळु घरडे,आर.एस. आंबुलकर,राहुल परुडकर,निखील कांबळे,रामभाऊ बागडे, जनार्दन मुन, हरिष जानोरकर,पुरषोत्तम गायकवाड,अरुण गाडे,धर्मेश फुसाटे,कैलास बोंबले,राजु फुलके,भिमराव चव्हाण,दिनकर,वाठोरे,सुधिर वालके,लाहाणु बंसोड,सिध्दार्थ उके,प्रा.घनश्याम धाबर्डे,संदेश खोब्रागडे,प्रदीप मंडल,जयंत साठे, डाॅ. मनोज मेश्राम,तक्षशिला वाघघरे, उज्वला गणविर,आम्रपाली, मेश्राम, निलु टेंभुर्णे, ,यशोधरा खोब्रागडे, नलिनी बागडे, इ.मोठ्या संखेने आंबेडकरी जनतेची उपस्थिति होती.
उद्या दि.३ डिसेंबर रोजी रोजी प्रा. रणजीत मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितित लक्षवेधी- उपोषण होईल.

आमचे चॅनल subscribe करा