
उद्या शुक्रवारी उद् घाटन:‘वंदे मातरम’च्या यशोगाथेने महोत्सवाची सुरवात
स्थानिक कलावंतांचेही प्रत्येक दिवशी सादरीकरण
ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद् गुरु जग्गी वासुदेव यांची आभासी पद्धतीने उपस्थिती
सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर उपस्थित राहणार
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,बावणकुळे,मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती
नागपूर, १ डिसेंबर २०२२: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या मध्य भारतातील सर्वात मोठ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उद्या शुक्रवार, २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार असून नागपूरकरांची प्रदीर्घ प्रतिक्षा संपली असून पुढील दहा दिवस मनोरंजनाची लयलूट नागपूरकर रसिकांना करता येणार आहे. कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांची प्रत्यक्ष तर ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद् गुरु जग्गी वासुदेव यांची आभासी उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीदेखील उपस्थिती राहील.
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्थानिक कलाकारांच्या ‘वंदेमातरम्’ या कार्यक्रमाने महोत्सवाचे उद् घाटन होईल. यात स्थानिक एक हजार कलाकारांचा समावेश असून नृत्य, नाट्य, गायन, वादन आदींचा सुरेख व सुरेल संगम असणार आहे.हा कार्यक्रम २५ हजार चौ.फूट आकाराचा ११ फूट उंचीच्या चार स्तरीय मंचावर सादर केला जाणार आहे.
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे पटांगण २५००० स्क्वेअर फुटांचा भव्य असा हा रंगमंच, २५००० रसिकांसाठी बसण्याची व्यवस्था, जवळपास १००० लाइट्स, ३५० माईक्स, ३५०० स्क्वेअर फुटांचे एल.ए.डी. स्क्रीनस्, ३००० कलाकार असे भव्य आयोजन यंदा राहणार आहे.
नागपूर-विदर्भाची व मध्य भारताची शान असलेल्या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले,आयोजन समितीचे सर्व उपाध्यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्य बाळ कुळकर्णी, सारंग गडकरी, अविनाश घुशे, हाजी अब्दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, ॲड.. नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, मनीषा काशिकर यांनी केले आहे.
स्थानिक कलावंतांचे सादरीकरण व मनोरंजनपर कार्यक्रमांचे असे आहे वेळापत्रक-
२ डिसेंबर – सुविख्यात अभिनेते नाना पाटेकर व सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या उपस्थितीत उद् घाटन सोहळा व स्थानिक कलाकारांच्या ‘वंदेमातरम’ यशोगाथेच्या सादरीकरणाने महोत्सवाची सुरवात.
३ डिसेंबर– सेवावस्ती निवासी मुलांचे लघुनाट्य ‘तारे जमीं पर’ व सुप्रसिद्ध गझल गायक पद्मश्री हरिहरन यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’.
४ डिसेंबर २०२२ – सकाळी ९.३० वाजता गीतापठन महायज्ञ.
सायंकाळी ६.३० वाजता श्याम देशपांडे यांचा ‘जागर राष्ट्रभक्तीचा’ हा कार्यक्रम व अमित त्रिवेदी यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
५ डिसेंबर २०२२ – ट्रान्सजेंडर कलावंतांची नृत्य प्रस्तुती व अभिनेते मनोज जोशी यांचे ‘चाणक्य’ हा नाट्य प्रयोग
६ डिसेंबर २०२२ – सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुंजीचे व्हायोलिन वादन व ‘तथागत’ हे महानाट्य.
७ डिसेंबर २०२२ – श्याम देशपांडे यांचा ‘जागर राष्ट्रभक्तीचा’ हा कार्यक्रम व ‘पुण्यश्लोक अहिल्या’ हे महानाट्य
८ डिसेंबर २०२२ – छत्तीसगढी पंथी नृत्य व मनोज मुंतशिर यांचा ‘माँ, माटी और मोहब्बत’ हा कार्यक्रम
९ डिसेंबर २०२२ – बालकला अकादमी प्रस्तुत ‘तारे जमीं पर’ व प्रसिद्ध अभिनेते व कवी शैलेश लोढा व इतर कवींचे कविसंमेलन
१० डिसेंबर २०२२ – सायली उजवणे व निलाक्षी खंडकर यांची शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्य प्रस्तुती व सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
११ डिसेंबर २०२२ – शिवमुद्रा ढोलताशा पथकाचा ‘शिवशाहीची रणधुमाळी हा कार्यक्रम व गायक मोहित चौहाण यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट व महोत्सवाची सांगता.
अशी आहे वाहन पार्किंग व्यवस्था –
संताजी सभाग्रृह – टू व्हिलर/फोर व्हिलन पार्किंग
संत रविदास सभागृह – टू व्हिलर पार्किंग
ओसीडब्ल्यू ऑफिस – टू व्हिलर/फोर व्हिलन पार्किंग
प्रेरणा कॉलेज – टू व्हिलर पार्किंग
नागपूर सुधार प्रन्यास – व्हीआयपी पार्किंग
धन्वंतरी रुग्णालय – शासकीय व पोलीस कर्मचारी वाहन पाकिंग
गीता जयंतीनिमित्त गीता पठणाचे विशेष आयोजन
याशिवाय, रविवार, ४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेदरम्यान होणा-या या गीता पठन महायज्ञ होणार असून याचे उद् घाटन श्रीनाथपीठ, श्री देवनाथ मठ, श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जीच्या प. पू. रेणुका मायबाई यांच्या हस्ते होणार असून राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका वंदनीय शांताक्का यांची आभासी उपस्थिती राहणार आहे. महायज्ञाच्या स्वागताध्यक्ष मा. कांचनताई गडकरी आहेत.
मिस कॉल द्या पासेस मिळवा –
नागपूरकरांना या सांस्कृतिक महोत्सवाचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने यंदा ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या पासेस मिळवता येणार आहेत. त्याकरीता नागरिकांनी 9158880522 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे. याद्वारे पासेस प्राप्त करता येतील.
–




आमचे चॅनल subscribe करा
