फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजस्‍वरवेध प्रस्‍तुत ‘कट्यार काळजात घुसली’ चा रविवारी नि:शुल्क प्रयोग

स्‍वरवेध प्रस्‍तुत ‘कट्यार काळजात घुसली’ चा रविवारी नि:शुल्क प्रयोग

Advertisements

– स्‍व. मनोहर म्‍हैसाळकर यांच्‍या स्‍मृतिंना समर्पित

– विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शताब्‍दी वर्षानिमित्‍त आयोजन

नागपूर, २१ नोव्हेंबर २०२२:  मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवणा-या दैदिप्यमान, अभिजात आणि अजरामर संगीत नाटकाच्‍या परंपरेतील नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ चा प्रयोग रविवार, २७ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग चौक, नागपूर येथे आयोजित करण्‍यात आला आहे. स्‍वरवेध प्रस्‍तुत हे नाटक विदर्भ साहित्य संघाचे पन्नास वर्षे आधारवड राहिलेले स्‍व. मनोहरराव म्हैसाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्‍त आयोजित करण्‍यात आला आहे, अशी माहिती स्वरवेधचे ॲड. भानुदास कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नागपूरचे थोर नाटककार पुरुषोत्‍तम दारव्‍हेकर यांच्‍या लेखणीतून साकारलेल्‍या या संगीत नाटकाने लोकप्रियतेची अनेक शिखरे पादाक्रांत केली. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्‍या संगीताने आणि पं. वसंतराव देशपांडे यांच्‍या सहज सुंदर अभिनयाने नटलेल्‍या ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाने नाट्य रसिकांच्‍या मनावर मोहिनी घातली होती. हे नाटक स्‍वरवेध, नागपूरतर्फे अतिशय ताकदीने हे नाटक रंगभूमीवर आणले आहे.

या नाटकाची संकल्पना आणि दिग्दर्शन ॲड. भानुदास कुलकर्णी व सारंग मास्टे यांची असून संगीत संयोजन ॲड. भानुदास कुलकर्णी यांचे आहे. निर्मिती डॉ. सौ. शीला कुलकर्णी आणि सौ. अनुजा परचुरे यांची आहे.

यात शंतनू ठेंगडी , आसावरी रामेकर जोशी, केतकी काणे सालनकर, ललीत घवघवे, सागर पंडित, प्रद्युम्न बायस्कर, पियुष वानखेडे, अभिलाष भुसारी, निखिल टोंगळे यांचा सहभाग आहे. अनिरुद्ध जोशी, डॉ. मंजिरी वैद्य अय्यर, आदित्य सावरकर, यश खेर, राधा ठेंगडी, साक्षी सरोदे, श्रृती बाईवार, आदिती मास्टे , लक्ष्यती काजळकर या गायकांनी यातील गीते गायिली आहेत.

प्रवेश नि:शुल्‍क असून प्रवेशिका अनिवार्य राहणार आहेत. प्रवेशिका विदर्भ साहित्य संघ, सीताबर्डी कार्यालय आणि ॲड. भानुदास कुलकर्णी यांच्‍या लक्ष्मीनगर कार्यालय येथे उपलब्ध करून देण्‍यात आल्‍या आहेत.

पत्रकार परिषदेला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर यांची उपस्थिती होती.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या