फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजराज्य नाट्य स्पर्धा पुरस्कारांची रक्कम वाढविणार : मुनगंटीवार

राज्य नाट्य स्पर्धा पुरस्कारांची रक्कम वाढविणार : मुनगंटीवार

Advertisements

नागपूर केंद्रावरील स्पर्धेचा शुभारंभ

नागपूर ,१६ नोव्हेंबर २०२२:: सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित ६१व्या महाराष्ट्र मराठी राज्य नाटय़ स्पर्धेच्या नागपूर केंद्रावरील प्राथमिक फेरीचा बुधवारी थाटात शुभारंभ झाला. लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात हा सोहळा झाला.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्घाटन सोहळ्यास दृकश्राव्य माध्यमातून शुभेच्छा दिल्यात. राज्य नाट्य स्पर्धेतील पुरस्कारांची आणि मानधनाची रक्कम वाढविणार, अशी घोषणा यावेळी त्यांनी केली.

स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी आणि ‘पैदागीर चित्रपटाच्या निर्मात्या वंदना जीवने यांच्याहस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी आणि ‘पैदागीर चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जीवने तर अध्यक्षस्थानी अखिल भारतीय नाटय़ परिषद महानगर शाखा अध्यक्ष सलिम शेख होते.

मान्यवर अतिथीनी कलावंतांच्या परिश्रमाला साथ देण्याचे आवाहन माध्यमांना यावेळी केले. यावेळी परीक्षकगण सुषमा कोठीकर, सुरेंद्र केतकर, संदीप देशपांडे यांचे स्वागत करण्यात आले.

संचालन नागपूर केंद्राच्या समन्वयक वैदही चवरे यांनी केले. नागपूर केंद्राच्या प्रमुख प्रज्ञा पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी महेश रायपूरकर, माणिक वड्याळकर, विनोद राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला रसिकांची भरगच्च उपस्थिती होती.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या