फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजओंकार स्वरूपा तुज नमो....

ओंकार स्वरूपा तुज नमो….

Advertisements

– सहजयोग परिवाराचा दिपावली महोत्सव

– यज्ञ, नृत्य, संगीत, योगसाधनेची मेजवानी

नागपूर,२८ ऑक्टोबर २०२२: दिवाळी म्हटली की मेजवानी ओघाने आलीच. पण, नागपुरातील श्री निर्मलादेवी सहजयोग ट्रस्टच्या वतीने आंतरराष्ट्रीय दीपावली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या त्रिदिवसीय आयोजनातून नागपूरकरांना यज्ञ, नृत्य, संगीत आणि योगसाधनेची अभिनव मेजवानी मिळते आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात स्थित पी.के.साळवे अ‍ॅकॅडमी ऑफ फाईन आर्टस् अ‍ॅण्ड म्युझिक संस्थेच्या विशाल प्रांगणात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या आयोजनात देश-विदेशातील १५ हजारांवर सहजयोग साधक उपस्थित आहेत.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशीच भाविक-रसिकांनी उत्साहाने उपस्थिती दर्शविली. औपचारीक उद्घाटन समारंभानंतर, वैश्विक शांततेसाठी हवनविधी करण्यात आला. या यज्ञात सविस्तर माहिती देऊन हवनविधी करण्यात आले. महाआरतीने हवनविधीचा समारोप झाला. त्यानंतर मौन सहजयोगासह सहजयोगाची इतर प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. कलावैभव संगीत अकादमीच्या दलाल बंधूंनी ‘हुआ है मन में उजियाराङ्क हा सुगम भजनांचा कार्यक्रम सादर करून भाविकांना भक्तीरसात चिंब केले. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दुसèया टप्प्यात नृत्यविदुषी प्रिती सोंदूर यांचे भरतनाट्यम् सादरीकरण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. विशेषत: श्रीअष्टलक्ष्मी स्तोत्रावर त्यांनी केलेले सादरीकरण ध्वनी आणि पदलालित्याचा उत्कृष्ट सादरीकरण होते.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात नाशिकच्या स्वरब्रम्ह संगीत अकादमीचे संचालक आणि पं.सुरेश वाडकर यांचे शिष्य पं.आनंद अत्रे यांनी भजन गायनाचे सुरेख सादरीकरण केले. आपल्या सादरीकरणाची सुरुवात त्यांनी ‘ओंकार स्वरूपा तुज नमो’ या भक्तीगीताने केली. त्यानंतर अभंग आणि भक्तीगीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. नागपूरचे प्रथम महापौर प्रसाद साळवे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार, ट्रस्टचे उपाध्यक्ष रमेश मंथाना, ट्रस्टचे सदस्य आणि स्थानिक नेतृत्वाची उपस्थिती होती.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या