फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजविद्यार्थी उन्नतीगृहात साजरी झाली दिवाळी

विद्यार्थी उन्नतीगृहात साजरी झाली दिवाळी

Advertisements

नागपूर,ता.२१ ऑक्टोबर २०२२: मैत्री परिवार संस्था द्वारा संचालित विद्यार्थी उन्नतीगृहात गुरुवार दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी दिवाळी साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर उपस्थित होते.त्यांनी मुलांना दिवाळीत मज्जा करा पण आरोग्याला सांभाळून करा तसेच दिवाळी आपल्या सर्वांकरिता किती प्रेरणादायक आहे या संदर्भात माहिती दिली.

या कार्यक्रमात वसतिगृहातील मुलांना अभ्यास करण्याकरीता जयश्री पिंपुटकर यांनी स्टडी टेबल भेट दिले.

यावेळी मैत्री परिवार संस्थेचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. माधुरी यावलकर यांनी केले.

या कार्यक्रमाला उपस्थित सौ. मोहरील, सौ. मुंजे, कुमारी चक्रपाणी, सौ मेनजोगे, सौ.वैशाली बोपर्डीकर, मनिषा गर्गे, सौ. मृणाल पाठक, प्रकाश रथकंठीवार, अनिल यावलकर, अशोक मुंजे, जितेंद्र नागपुरकर, दिलीप ठाकरे आदी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या