फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजविदर्भ साहित्‍य संघाच्‍या अध्‍यक्षपदी प्रदीप दाते यांची निवड

विदर्भ साहित्‍य संघाच्‍या अध्‍यक्षपदी प्रदीप दाते यांची निवड

Advertisements

नागपूर, १९ ऑक्टोबर २०२२:: विदर्भ साहित्‍य संघाच्‍या अध्‍यक्षपदी प्रदीप दाते यांची आज झालेल्‍या कार्यकारिणीच्‍या तातडीच्‍या बैठकीत निवड करण्‍यात आली. विदर्भ साहित्‍य संघाच्‍या सांस्‍कृतिक संकुल, सीताबर्डी, नागपूर येथील कार्यालयात वि. सा. संघाच्‍या कार्यकारिणीची बैठक पार पडली. मनोहर म्‍हैसाळकर यांचे निधनानंतर वि. सा. संघाचे अध्‍यक्षपद रिक्‍त झाले होते.

विदर्भ साहित्‍य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यात प्रदीप दाते यांच्‍या नावावर अध्‍यक्षपदासाठी शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले. प्रदीप दाते हे विद्यमान कार्यकारिणीत शाखा समन्‍वयक म्‍हणून कार्यरत आहेत.

प्रदीप दाते यांना संस्‍थात्‍मक कार्याचा दीर्घ अनुभव असून ते गेल्‍या सुमारे चार दशकांपासून सामाजिक, सांस्‍कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रीय आहेत. यशवंतराव दाते स्‍मृती प्रतिष्‍ठानचे ते अध्‍यक्ष असून अनेक संघटनांमध्‍ये विविध पदांवर कार्यरत आहेत. विदर्भ साहित्‍य संघाशी गेल्‍या तीन दशकांपासून ते संबंधित असून अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळात ते विदर्भ साहित्‍य संघाचे प्रतिनिधीत्‍व करीत आहेत. महाराष्‍ट्रातल्‍या अनेक सामाजिक कार्यकर्त्‍यांशी व साहित्यिकांशी त्‍यांचे निकटचे संबंध आहेत. त्‍यांच्‍या नेतृत्‍वात विदर्भ साहित्‍य संघाचे कार्य समर्थपणे पुढे जाईल, असा विश्‍वास कार्यकारिणीतर्फे व्‍यक्‍त करण्‍यात आला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या