Homeनागपूर न्यूजविष्णू मनोहर यांचा चौदावा विश्‍वविक्रम रविवारी

विष्णू मनोहर यांचा चौदावा विश्‍वविक्रम रविवारी

सहा हजार किलोंच्या कढईत बनवणार ‘महाचिवडा!’

कांचन गडकरी,अमृता फडणवीस यांची विशेष उपस्थिती

नागपूर,ता. १२ ऑक्टोबर २०२२: जागतिक अन्नदिनाचे तसेच दिवाळीचे औचित्य साधून सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ६ हजार किलोच्या भव्य कढईत ‘महाचिवडा’बनवणार असून हा त्यांचा चौदावा विश्‍वविक्रम असणार आहे.ही माहिती त्यांनी बजाज नगर येथील विष्णूजी की रसोई येथे आयोजित पत्र परिषदेत दिली.

विष्णू जी की रसोई येथे येत्या रविवारी दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता हा विक्रम रचण्यात येईल.राम बंधू चिवडा मसाला वापरुन हा महाचिवडा तयार केला जाणार आहे.

या उपक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून संस्कार भारतीच्या महानगर अध्यक्षा कांचन गडकरी व गायिका व बँकर अमृता फडणवीस यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

१०० किलोच्या ३६ ते ४० पोती महाचिवडा तयार होणार असून हा चिवडा गरिबांना एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गडचिरोलीतील आदिवासींना दिवाळीची भेट म्हणून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी विष्णू मनोहर यांनी दिली.

या करिता विशेष पॅकेट बनविण्यात आले असून प्रत्येक पॅकेटमध्ये २५० ग्राम चिवडा राहणार आहे.

पत्र परिषदेला रामबंधू विपणन व्यवस्थापक भानुदास गुंडकर,आकार फिल्म्सच्या संचालक रेणुका अग्रवाल,नचिकेत जामदार,एमडी ट्रॅव्हल्सचे संचालक मिलिंद देशकर,भूमिपात्रचे संचालक विजय जत्थे उपस्थित होते.

Latest बातम्या