

ईडीला एकही पुरवा सिद्ध करता आला नाही:न्यायालयाचे निरीक्षण
नागपूर,ता. ८ ऑक्टोबर २०२२: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने अतिशय महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहेत.त्यामुळे देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग सुकर झाला आहे.विशेष म्हणजे त्यांच्यावर ठेवलेल्या आरोपांपैकी ईडीला एकही पुरावा सिद्ध करता आला नसल्याने सर्व आरोप हवेत करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या बोलण्याला कोणतीही विश्वाहर्ता नाही.त्यांच्या आरोपांवरुन देशमुख यांना दोषी ठरवल्या जाऊ शकत नाही,असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.पान क्रमांक ४४ वर न्यायालयाच्या या निरीक्षणाची नोंद आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबरला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीच्या प्रकरणात जो जामीन दिला आहे त्यांत काही महत्वाचे निरीक्षण पुढील प्रमाणे न्यायालयाने नोंदविले आहेत-
१) मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जे जिलेटीन ठेवण्यात आले होते त्या केस मध्ये एनआयए ने सचिन वाझे याला अटक केली. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लागलीच सचिन वाझे याची बदली केली नंतर निलंबीत करुन सरकारी सेवेतुन बाहेर काढले. तसेच परमबिर सिंग यांनी मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन हकालपटी करुन कमी महत्वाच्या पदावर त्यांना पाठविले. परमबिर सिंग व सचीन वाझे यांच्यावर कारवाई केल्याने त्यांनी बदल्याच्या भावनेतुन अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले. ( पान क्रमांक २ व ९ )
२) सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी कोर्टात १६४ अंतर्गत दिलेल्या बयाणात म्हटले आहे की, सचिन वाझे हा बार आणि रेस्टॉरेंट कडुन जी खंडणी बसुल करायचा ती नंबर १ साठी. जेव्हा संजय पाटील यांनी सचिन वाझेला विचाराले की, नंबर १ म्हणजे कोण तेव्हा सचिन वाझेने संजय पाटील यांना सांगीतले की, नंबर १ म्हणजे परमबिर सिंग( पान क्रमांक ६ व ४२ )
३) अनिल देशमुख यांच्या विरोधात ही केस नुसती आणि नुसती ज्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे अश्या सचिन वाझे व परमबिर सिंग या बदनाम व्यक्तींनी केवळ ऐकीव माहितीवर ज्याचा त्यांच्याकडे काहीच पुरावा नाही अशा आरोपावर आहे. ( पान क्रमांक ११ )
४) न्यायालयाच्या निरीक्षणामध्ये ही बाब सुध्दा समोर आली आहे की, बदली आणि पोस्टींग मध्ये परमबिर सिंग आणि सचिन वाझे यांनी जे आरोप केले आहेत त्यात काही नियबाहय आढळुन आले नाही. ( पान क्रमांक ३३ व ३४ )
५) सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला पैसे दिले नाही. हे सर्व आरोप हवेत दिसतात. ( पान क्रमांक ३९,४२,४४, ४५,४६ )

आमचे चॅनल subscribe करा