

• कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे नेते खा.डॉ. शशी थरूर यांनी भरले नामांकन.
• नामांकनाच्या वेळी डॉ. आशिषराव र. देशमुख यांची उपस्थिती.
• दि. ०१ व ०२ ऑक्टोबर २०२२ ला डॉ. शशी थरूर यांचा नागपूर दौरा.
नागपूर,ता.३० सप्टेंबर २०२२: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे नेते खासदार डॉ. शशी थरूर यांनी आज नामांकन भरले. डॉ. शशी थरूर हे कॉंग्रेसचे लोकप्रिय खासदार असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने होत असून, ही स्वागतार्ह बाब आहे. पक्षात विकेंद्रीकरणासाठी हे महत्वाचे पाऊल असून कॉंग्रसचे भविष्य उज्ज्वल आहे.शशी थरूर यांच्यात कॉंग्रेस पक्षाला नवी दिशा दाखविण्याची क्षमता असल्याचे मत नागपूरचे माजी आमदार, कॉंग्रेस नेते व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या संसदीय मंडळाचे सदस्य डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.नवी दिल्ली येथे शशी थरूर यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दि. ३० सप्टेंबरला नामांकन भरले. त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ. देशमुख उपस्थित होते.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पक्षाला मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. पक्षाला उंच भरारी घेता यावी म्हणून कॉंग्रेस श्रेष्ठींनी लोकशाही पद्धतीने निवडणुकीसाठी घेतलेले हे महत्वाचे पाऊल आहे. डॉ. शशी थरूर यांचे पक्षातील सर्वांशी सलोख्याचे संबध आहेत. पक्षाला नवी दिशा दाखविण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यानिमित्याने, पक्षाला नव्या ताकदीने पुढे नेऊन देशात कॉंग्रेसला सत्तेत आणण्याची जबाबदारी ते समर्थपणे सांभाळू शकतील, असा विश्वास आशिष देशमुख यांनी व्यक्त केला.
युवकांचे प्रश्न, बेरोजगारी, उद्योग, कृषी, महागाई असे विषय त्यांनी गंभीरतेने हाताळल्यास कॉंग्रेसला सुगीचे दिवस येतील. पारदर्शी राजकारण करून कॉंग्रेसचा विचार ते तळागाळातील लोकांपर्यंत निश्चितपणे पोहोचवण्यास सक्षम.आहेत.
नव्या पिढीची, युवकांची, नव-चैतन्याची व क्रियाशील कॉंग्रेस हवी असल्यास डॉ. शशी थरूर हे योग्य उमेदवार आहेत. १२ राज्यांतील कॉंग्रेस समर्थकांचा त्यांना उघड-उघड पाठींबा असून संपूर्ण भारतातील कॉंग्रेस नेते व कार्यकर्त्यांचा पाठींबा त्यांना मिळत आहे. ते निश्चितपणे निवडून येतील, असा विश्वास आशिष देशमुख यांनी व्यक्त केला.
त्यामिनित्याने, दि. १ व २ ऑक्टोबर २०२२ ला खा.डॉ. शशी थरूर नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी समस्त कॉंग्रेस पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी अवश्य यावे, असे आवाहन आशिष देशमुख यांनी केले आहे.
दि. १ ऑक्टोबर २०२२ ला संध्याकाळी ६.०० वाजता त्यांची दीक्षाभूमी, नागपूर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
