Homeनागपूर न्यूजभुजबळांच्या विरोधात भाजयुमो आक्रमक; राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सरस्वती पूजन

भुजबळांच्या विरोधात भाजयुमो आक्रमक; राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सरस्वती पूजन

Advertisements

नागपूर,ता.२८ सप्टेंबर २०२२: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नुकतेच वादग्रस्त विधान केलं.  शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्याचा भाजयुमोतर्फे आज राष्ट्रवादी कार्यालय, बस स्टॅंड चौक, गणेशपेठ समोर सरस्वती पुजन करून जाहीर निषेध व्यक्त केला. या राज्यात जर बुद्धीची देवता सरस्वती व शारदा मातेचा फोटो लावण्यावर कोणी जर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर भाजयुमो कदापी सहन करणार नाही,असा पवित्रा त्यांनी घेतला.

छगन भुजबळ यांनी त्वरीत आपले वादग्रस्त विधान मागे घ्यावे व महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अन्यथा येणा-र्या काळात भाजयुमो या विषयावर अजुन आक्रामक स्वरूपाचे आंदोलन करेल,असा इशारा देण्यात आला.

आजचे आंदोलन प्रमुख्याने भाजपा शहर अध्यक्ष प्रविण दटके व भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या मार्गदर्शनात व भाजयुमो प्रदेश सचिव राहुल खांगार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी प्रामुख्यामे भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, मंडळ अध्यक्ष बादल राऊत, पंकज सोनकर, निलेश राऊत, सन्नी राऊत, भाजयुमो प्रदेश कार्यकारिणी सदस्य देवदत्त (देवा) डेहणकर, वैभव चौधरी, संकेत कुकडे, प्रसाद मुजुमदार, डिम्पी बजाज,मनमीत पिल्लारे, उपस्थित होते.

सोबत अक्षय ठवकर, हरिश निमजे, अथर्व त्रिवेदी, रितेश पांडे, अनुप साळवे, गौरव हरडे, अश्विन निमजे, सागर घाटोळे, पुष्कर पोरशेट्टीवार, कामाक्षा रेंडके, राहुल वाटकर, समीर मांडले, अमित पांडे, पवन महाकालकर, सोनु वर्मा, भावेश माताघरे, रुपेश कावडे, विक्की बगले, पिंकेश पटले, अनुज गोरे, रितेश पांडे, अमित सलामे, नवीन बिसेन, अभय खडसे, अमित बारई , प्रणीत पोचमपल्लीवार, राकेश भोयर, स्वप्निल भालेराव, आशुतोष भगत उपस्थित होते.

Latest बातम्या