फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजसावनेर नंतर हिंगणा तालुक्यात लम्पीसदृश्य लक्षणे ; जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात

सावनेर नंतर हिंगणा तालुक्यात लम्पीसदृश्य लक्षणे ; जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात

Advertisements

नागपूर दि.१४ : नागपूर जिल्ह्यात सावनेर नंतर हिंगणा तालुक्यात देखील लम्पीसदृश्य लक्षणे असणारी गुरे आढळून आली आहे. नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून जिल्ह्यामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
आज नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यामधील दोन बाधित गावे उमरी आणि बडेगाव येथे लसीकरणाची मोहीम सुरू झाली. पाच किलोमीटर अंतराच्या त्रिज्जेमध्ये असलेल्या सर्व गावांमध्ये लसीकरण राबविण्यात येणार असून आज सुमारे सहा गावांमध्ये एकूण ९९५ गोवंशीय पशुधनाला गोटफॉक्सची लस लावण्यात आली.
तसेच गावामध्ये फवारणीचे कार्यक्रमही राबविण्यात आले.

आज हिंगणा तालुक्यातील जुनेवाडी गावामध्ये सुद्धा दोन बाधित जनावरे आढळून आली. याठिकाणी पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथील डॉक्टरांनी जाऊन नमुने गोळा करण्याची प्रक्रिया केलेली आहे.सदर नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात येतील. उद्यापासून सदर गावाच्या पाच किलोमीटरच्या त्रिजमध्ये येणाऱ्या १३ गावांमध्ये लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. सुमारे ४५९० गोवंशीय जनावरांचे पशुधनाला मोफत गोट बॉक्स लसीकरण करण्यात येईल.

दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी घाबरून न जाता जनावरांना लक्षणे दिसल्यानंतर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. योग्य औषध उपचार केल्याने बाधित जनावरे दोन ते तीन आठवड्यात पूर्णपणे बरी होतात. रोगाने बाधित जनावरांना तात्काळ निरोगी जनावरांपासून वेगळे बांधण्यात यावे आणि त्यांचा औषधोपचार जागीच करण्यात यावा.रोगाने बाधित झालेली जनावरे विकू नये अथवा त्यांची वाहतूक करू नये, असे आवाहनही पशुपालकांना करण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या