Homeनागपूर न्यूजअस्थिरोगतज्ज्ञांची १० व ११ सप्टेंबरला ‘‘व्हॉसकॉन’ वार्षिक परिषद

अस्थिरोगतज्ज्ञांची १० व ११ सप्टेंबरला ‘‘व्हॉसकॉन’ वार्षिक परिषद

Advertisements

उपराजधानीत अडीचशे अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांची मांदियाळी

पंधरा कार्यशाळांमध्ये महत्वपूर्ण माहितीचे होणार आदान-प्रदान

नागपूर, ता. ७ सप्टेंबर २०२२: महाराष्ट्र आर्थोपेडिक असोशिएशन, विदर्भ आर्थोपेडिक असोसिएशन तसेच नागपूर आर्थोपेडिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नागपुरातील हॉटेल रेडिएशन ब्लू येथे १० आणि ११ सप्टेंबरला दोन दिवसांच्या ३८ व्या वार्षिक ‘व्हॉसकॉन परिषद-२००२२’ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.मकरंद धोपावकर यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत दिली. याप्रसंगी मंचावर आयोजनाचे अध्यक्ष डॉ.सत्यजीत जगताप व सचिव डॉ.निनाद गोडघाटे उपस्थित होते.

संमेलनाचे आयोजन डॉ.आर.एम.चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडले जाणार आहे.बदलत्या काळात वैद्यकशास्त्राने मोठी झेप घेतली आहे. अपघातामुळे हाडांमधील कॅल्शियम -हास पावतात. मात्र नव्या तंत्रज्ञानातून हिप पासून तर एल्बोच्या वाढत्या समस्यांवर अत्याधुनिक उपचार आले. पुर्वी ‘एल्बो रिप्लेसमेंट’, हिप रिप्लेस्मेंटला फार चांगले यश मिळत नव्हते, परंतु आता कृत्रिम ‘एल्बो’, हिप, गुडघ्याचे नव-नवीन डिझाईन उपलब्ध होत असून शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्या विदर्भात सुमारे ५०० आर्थोपेडिक तज्ज्ञ असले तरी यापैकी अडीचशेवर तज्ज्ञ नागपुरात आहेत, अशी माहिती आर्थोपेडिक तज्ज्ञांनी आज येथे दिली.

अपघातामध्ये जखमी झाल्यानंतर मानेपासून तर एल्बो पर्यंत, कमरेच्या हाडांपासून तर पायांच्या बोटापर्यंतच्या शस्त्रक्रिया करताना अनेक आव्हाने आर्थोपेडिक तज्ज्ञांना पेलवावी लागतात. अशावेळी कृत्रिम हाडे, शरीरातील हाडांशी समरस होत नाही, अनेक अडचनी पुढे येतात. याशिवाय माकडहाडांची समस्या,लहान मुलांमधील हाडांचे विकार,ट्यूमर,विविध प्रकारचे फ्रॅक्चर,अद्यावत उपचार पद्धती तसेच अनेक शस्त्रकिया करताना नवीन तंत्रज्ञानाची माहिती या परिषेदत चर्चेला येणार असल्याचे डॉ.सत्यजित यांनी सांगितले.

परिषदेत एकूण १५ कार्यशाळा राहणार असून १० तारखेला १० कार्यशाळा तर ११ तारखेला ५ कार्यशाळांचे अयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या माध्यमातून अस्थिव्यंगोपचार (आर्थोपेडिक) क्षेत्रात कार्यरत डॉक्‍टरांना संशोधनासह उपचाराचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच नव्याने येत असलेल्या ‘उपकरणांच्या’ संदर्भात ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न होतील. परिषदेत सुमारे तीनशेवर प्रतिनिधी उपस्थित असतील,अशी माहिती डॉ.सत्यजित जगताप यांनी दिली.

व्हॉसकॉन-२०२२’परिषदेत यांचा राहणार सहभाग-

नागपुरात होणाऱ्या ‘व्हॉसकॉन-२०२२’ परिषदेचे उद् घाटन शनिवारी (ता.१०) रात्री ८ वाजता उद्‌घाटन होईल. यावेळी ज्येष्ठ अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. अजित फडके यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येईल. तसेच आदिवासी संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. संजीव चौधरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. डी. डी. तन्ना असतील. परिषदेत देशभरातील अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर बाभुळकर, डॉ. हरीश भेंडे, डॉ. जवाहर जेठवा, डॉ. आशिष बाभूळकर, डॉ. अभय नेने, डॉ. प्रदीप, डॉ. कोठाडिया, डॉ. डब्ल्यू. एम. गाडेगोणे, डॉ. पंकज जिंदाल, डॉ. सुब्रोंशु मोहंती, डॉ राजीव शहा, वडॉ अभिजित वाहेगावकर, डॉ प्रदीप नेमाडे, डॉ समीर गुप्ता, डॉ वीरेंद्र कडियान, डॉ अजित शिंदे, डॉ अशोक गावस्कर, डॉ विजयानंद लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर विविध चर्चेत, कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.

 

Latest बातम्या