फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसमाजाने एलजीबीटी समूहास स्वतःमध्ये सामावून घ्यावे: निकुंज जोशी

समाजाने एलजीबीटी समूहास स्वतःमध्ये सामावून घ्यावे: निकुंज जोशी

Advertisements

एलजीबीटी हा वेगळा समाज नाही

‘रूबरू’ ह्युमन लायब्ररीचा अनोखा उपक्रम

नागपूर,ता.२० ऑगस्ट २०२२: स्त्री पुरुष यासारखेच आम्ही सुद्धा एक समाजाची प्रकृती आहोत आम्ही जसे आहोत तसे समाजाने आमच्याशी एकरूप होण्याची गरज आहे.समाजाने एलजीबीटी समूहास स्वतःत सामावून घ्याव, एलजीबीटी हा वेगळा समाज नाही असे तळमळीचे विचार ‘सारथी’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निकुंज जोशी यांनी मांडले.नागपुरात प्रथमच ‘रूबरू’ ह्युमन लायब्ररी हा अनोखा उपक्रम सुरु झाला असून आज दि. २० ऑगस्ट रोजी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह येथे झालेल्या उद्‌घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

अध्यक्ष पदी ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया अय्यर तर ठाणे येथील ज्येष्ठ साहित्यिक विक्रम भागवत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच मंचावर रूबरू ह्यूमन लायब्ररीच्या कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर स्वाती धर्माधिकारी उपस्थित होत्या.

यावेळी रूबरू ह्यूमन लायब्ररीचे पुस्तक म्हणून आपला जीवनानुभव सांगणाऱ्या निकुंज जोशी यांनी समाजात सततची मिळणारी निकृष्ट वागणूक यावर खेद दर्शविला.

निकुंज जोशी यांच्याप्रमाणेच बाईक रायडर आणि ट्रॅव्हलर स्नेहल वानखेडे यांनीही आपले अनुभव मांडले.

सुप्रसिद्ध लेखक विक्रम भागवत यांनी ‘ह्युमन लायब्ररीची’ संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची ताकद व कुवत ही नागपूरकरांमध्ये अधिक असल्याचे नमूद करीत, रूबरू ह्यूमन लायब्ररीच्या संकल्पसिद्धीची पहिली पायरी आज नागपूरकरांनी गाठली असल्याची पावती त्यांनी दिली.
ह्यूमन लायब्ररीच्या निमित्ताने समाजाने आपला परिघ ओलांडायला हवा असेही त्यांनी म्हटले.

सुप्रिया अय्यर यांनी ह्यूमन लायब्ररी ही अभिनव संकल्पना असल्याचे नमूद करुन,माणसांच्या गोष्टीत विश्वरूप दर्शन घडत असतं प्रत्येक माणसाच्या कृती व वागणुकी मागे विशेष असे कारण दडलेले असते हे या निमित्ताने समजून घेता येईल असे त्या म्हणाल्या. माणसाला माणूस वाचता येणे आणि समजून घेता येणं हे सर्वात कठीण कार्य या उपक्रमाच्या निमित्ताने साधल्या जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास रूबरू ह्यूमन लायब्ररीच्या पहिल्या टप्प्यातील ‘पुस्तक’ म्हणून व्यक्त होणारे व्यसनाधीनतेवर मात करणारे तुषार नातू, लैंगिकतेबाबत महत्वाचे कार्य करणारे निकुंज जोशी, बाईक रायडर स्नेहल वानखेडे, कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध लढलेल्या रुबीना पटेल आणि कॅन्सर सारख्या रोगाला सामोरे जाणारे रणजीत उंदरे उपस्थित होते. त्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

उद्या रविवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी दूपारी ३ वाजता पासून या सर्वांचे अनुभव नागपूरकरांना याच स्थळी
प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळणार आहे,हे विशेष!

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.स्वाती धर्माधिकारी यांनी केले. परिचय डॉक्टर विनिता हिंगे तर संचालन आभा मुळे यांनी केले. आभार वर्षा बाशु यांनी मांडले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या