फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसिनेट पदवीधर नोंदणीसाठी २५ जुलै आज शेवटचा दिवस...

सिनेट पदवीधर नोंदणीसाठी २५ जुलै आज शेवटचा दिवस…

Advertisements

.

पदवीधारकांनो सिनेट नोंदणी करा

नागपूर,ता. २४ जुलै २०२२: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २८ एप्रिल रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दर ५ वर्षांनी होणाऱ्या अधिसभा निवडणुकांकरिता पदवीधरांची नोंदणी सध्या सुरू आहे. याकरिता, नागपूर विद्यापीठाची पदवी असलेल्या आणि नागपूर विद्यापीठ क्षेत्रात राहणाऱ्या पदवीधरांना अधिसभा निवडणुकीसाठी नोंदणी करता येईल असे त्यात नमूद केले आहे.१ मार्च २०१७ पासून लागू करण्यात आलेला महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६, राज्यातील ११ विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांसाठी,विद्यापीठ कायदा लागू आहे.

यातील कलम १३१ मधील तरतुदीनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवीधरांकडून नोंदणीकृत पदवीधरांच्या नोंदवहीत नावे नोंदविण्याकरिता अर्ज विद्यापीठातर्फे मागविण्यात येत आहेत.गेल्या तीन महिन्या पासून अनेकांच्या व्हाट्सएपवर किंवा चर्चेत नागपूर विद्यापीठातून पदवी घेतली आहे का? पदवी पाठव,सिनेट नोंदणी कर!असे वाचले किंवा ऐकले असेल जुन्या जाणत्यांसाठी हे नवीन नाही पण अनेकांसाठी नवे आहे.काय सिनेट? काय निवडणूक? काय नोंदणी? अनेकांना प्रश्न पडत पडलेत.

विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाचे दहा नोंदणीकृत पदवीधर अधिसभेवर निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी विद्यापीठाच्या पदवीधारकांकडून नोंदणीकृत पदवीधर म्हणून नाव नोंदणीसाठी तसेच मतदार यादी तयार करण्यासाठी नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज करण्यासाठी (तिसऱ्यांदा मुदत वाढ करून) आज २५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. विद्यापीठाने पदवीधरांच्या नोंदवहीत नोंद करणे आणि नोंदणीकृत पदवीधरांच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, ही प्रक्रिया यामार्फत सुरू केलेली आहे.

नव्याने नोंदणीकृत पदवीधर म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करावा असे अधिसूचनेत सांगितले आहे. नोंदणीकृत सिनेट पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नोंद होण्यासाठी दिलेल्या ऑनलाइन पद्धतीव्यतीरिक्त इतर आलेले अर्ज, अपूर्ण अर्ज तसेच आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज नाकारले जातील, असेही विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.काहींना नोंदणी पद्धती किचकट तर काहींना (युवावर्गाला) सोपी वाटत आहे.

२८ एप्रिल पासून नोंदणी सुरू होऊन सुद्धा अनेक पदवीधारक या पासून अनभिज्ञ आहेत असे दिसून येत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे २०२२-२३ हे शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे त्याचदरम्यान इंडियन सायन्स कॉंग्रेसचे आयोजन नागपूर विद्यापीठात होणार असून त्या दृष्टीने लगबग सुरू आहे. विद्यापीठाला १०० वर्षे पूर्ण होत असतांना नोंदणी कशी आणि किती व्हायला हवी हा भाग वेगळा.परंतु २०१७ मध्ये फक्त १७३४० मतदार नोंदणी झालेली होती.
झालेले मतदान तर ७१३७ फक्त ४१.१६ टक्के!

ज्या सभागृहात विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले जातात, विद्यापीठाच्या भविष्याची दिशा ठरविली जाते अश्या सन्मानित सभागृहात निवडून देणाऱ्या सदस्यांना निवडून देणारे सदस्य इतके अत्यल्प असतील तर नक्कीच शिक्षित नागरिकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे.

भंडारा, गोंदिया नागपूर शहर,नागपूर ग्रामीण आणि वर्धा हे नागपूर विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे.
सिनेट म्हणजे नेमकं काय आहे, हेच शिक्षितांना कळत नाही,त्यात आमचा फायदा काय? असे प्रश्न सुद्धा येतात.

त्यातच आधार कार्ड नोंदणी साठी महत्वाचे असल्याने मागणी केले असता, “आजकाल फ्रॉड होतात” म्हणून आधार कार्ड द्यायलाही काही पदवीधारक मागे पुढे पाहतात. स्वतःसुद्धा नोंदणी करीत नाही,पण काही जागरूक नागरिक स्वतःहून स्वयंप्रेरणेने नोंदणी साठी पुढे आलेले आहेत.नोंदणी करतांना नागपूर विद्यापीठाची पदवी किवा पदव्युत्तरची पदवी प्रमाणपत्र आवश्यक असून २०२० च्या आधी उत्तीर्ण असलेल्यांना पदवी प्रमाणपत्र पाहिजेच आहे तर २०२० किंवा २०२१ मध्ये उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्याबाबद मुभा देण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज सादर करतांना दिलेल्या ९४ मतदान केंद्रापैकी आपणास मतदानास सोईस्कर असलेला मतदान केंद्र सुद्धा निवडायचा आहे, ज्यात जाऊन मतदान करावयाचे आहे. अनेक संघटना आणि व्यक्ती या नोंदणीसाठी व्यक्तिशः संपर्क करून नोंदणी करीत असून या वेळी तंत्रज्ञानाचा म्हणजेच व्हाट्सएपचा वापर कागदपत्रे मागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे.

अनेकांना ही पद्धती आवडली असून,अनेकांनी ऑनलाइन फॉर्म भरून कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून २० रुपये शुल्क ऑनलाइन भरल्यानंतर सुद्धा पुन्हा कागदपत्रे घेऊन स्वतः विद्यापीठात जमा करण्याच्या पद्धतीवर नाक मुरडले आहे.परंतु अनेक संघटना यात पुढाकार घेऊन स्वतः सोयीस्कर पार पाडत असून अनेकांचा त्रास वाचत आहे.

आज २५ जुलै ला नोंदणी बंद होणार आहे.प्रत्येक ५ वर्षात विद्यापीठाच्या अधिसभेत म्हणजेच सभागृहात १० सदस्य निवडून देण्याच्या प्रक्रियेत आपल्या विद्यापीठातून पदवीप्राप्त नागरिकांनी भाग घेऊन विद्यापीठाच्या प्रगतीप्रति व विद्यार्थ्यांच्या भविष्याप्रति जागरूक राहून आपले कर्तव्य पार पाडावे त्यासाठी आपण आपली नोंदणी करणे आवश्यक असून नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन आपले अर्ज सादर करून २० रुपये शुल्क भरून त्याची प्रिंट काढून, कागदपत्रे विद्यापीठात जमा करून नोंदणी पूर्ण करून घ्यावी किंवा अधिक माहिती व नोंदणी साठी 9545745580 या क्रमांकावर संपर्क करावे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या