

१३० स्पर्धकांनी घेतला सहभाग
अंतिम फेरी रविवार दिनांक २४ जुलै रोजी
नागपूर,ता.१७ जुलै २०२२: ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमी, नागपूरतर्फे आयोजित खुल्या गीत गायन स्पर्धेची प्रथम आणि द्वितीय फेरी, अमृत भवन, सिताबर्डी येथे नुकतीच संपन्न झाली. स्पर्धेचे उदघाटन सूर्यप्रकाश सिंह बैस व प्रदीप गौर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाली.याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून प्रशांत ढाबरे व पंकज सिंह उपस्थित होते.
एकूण १३० स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत परिक्षकांनी प्रथम फेरीमधुन एकूण ६० स्पर्धकांची द्वितीय फेरी साठी निवड केली.यानंतर त्वरित एका तासानंतर दुसऱ्या फेरीला प्रारंभ झाला आणि रात्री उशिरा पर्यंत सुरु असलेल्या या द्वितीय फेरी मधुन एकूण तीस स्पर्धक अंतीम फेरी साठी पात्र ठरले.
या दोन्ही फेरी मध्ये स्पर्धकांनी कराओके तंत्राच्या माध्यमातून आपले सादरीकरण केले, अंतीम फेरी दि.२४ जुलै ला अमृत भवन येथे सकाळी १० वाजता प्रारंभ होईल.
अंतीम फेरी साठी पात्र ठरलेल्या स्पर्धकांना वादकांसोबत आपल्या गीताला लाईव्ह प्रस्तुत करावे लागणार आहे.
अतीशय चुरशीच्या स्पर्धेतून निष्पक्ष परीक्षण करण्यासाठी परिक्षकांची प्रतिभा पणाला लागली होती.
प्रथम फेरी साठी
शहरातील सुप्रसिद्ध गायीका मानसी भांदककर, तालवादक संजय बारापात्रे, ज्येष्ठ की-बोर्ड वादक अब्दुल जहीर, सुप्रसिद्ध गायक अविनाश घोंगे हे परिक्षक म्हणून लाभले होते.
तर द्वितीय फेरीसाठी डॉ.अर्चना देशमुख, सुनिल वाघमारे, मानसी भांदककर, प्रमोद देशमुख यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

शिस्तबद्धरित्या पार पडलेल्या या स्पर्धेतून गोळा झालेला निधी, कलावंतांच्या कल्याणासाठी उपयोगात आणल्या जाणार असल्याचे, संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम ताईस्कर यांनी सांगितले.
स्पर्धेचे प्रायोजक म्हणून शार्प ट्रेडर्सचे मंसुर भाई दमानी, ‘कलावंत ऐप’ चे निर्माते राजेश ढाबरे लाभले असून, प्रथम पुरस्कार १०,००० रुपये स्व.ओ.पी.सिंह यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एस.पी. सिंह व प्रदिप गौर यांच्यातर्फे, द्वितीय पारितोषिक कलावंत ऐप चे निर्माते राजेश ढाबरे, तृतीय पारितोषिक स्व. पंडित अमृतराव निस्ताने व स्व.बंटी निस्ताने यांच्या स्मृती प्रित्यर्थमोरेश्वर निस्ताने यांच्या तर्फे प्राप्त होणार असून, चार प्रोत्साहनार्थ पारितोषिके प्रशांत ढाबरे यांच्यातर्फे विजेत्यांना प्राप्त होणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक राधिकाताई पांडव चॅरीटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा गिरिश पांडव, शार्प ट्रेडर्सचे मंसुर भाई, व्ही.फाईव्ह स्टुडिओ चे नितीन झाडे, सरयु महापरिण ब्राम्हण सभेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पं.रामनारायण मिश्र हे आहेत.
सहप्रायोजक कपिल साबळे, विवेक भोरे हे असुन ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमी नागपूरच्या या आयोजनासाठी अनेक सुप्रसिद्ध कलावंतांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत.

संस्थेचे मार्गदर्शक प्रमोद देशमुख, अब्दुल जहीर यांनी वेळोवेळी आपले मोलाचे सहकार्य दिले तसेच या आयोजनाच्या यशस्वीतेसाठी शहरातील संस्थेचे नोंदणीकृत सदस्य, निलिमा गावंडे, पुष्पलता भोर,किरण दिडशे, वैशाली चंदेल, विशाल मानकर, अंजली नहारकर, शुभम पौनीकर , राम खडसे, वैशाली गणविर, कामिनी बनसोड, कामिनी भागवते, अकील खान तसेच संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष पी.कुमार, उपाध्यक्ष राजू व्यास, कोषाध्यक्ष प्रशांत खडसे, सचिव रिनेश जाणे, सहसचिव चंंन्द्रशेखर शामकुवर, संचालक संगीता गावंडे, राजेश गजभिये हे अथक परिश्रम घेत आहेत.




आमचे चॅनल subscribe करा
