Homeनागपूर न्यूजनिःस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन द्वारा वृक्षारोपण दिवस साजरा

निःस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन द्वारा वृक्षारोपण दिवस साजरा

Advertisements

नागपूर,ता.१ जुलै २०२२: एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्याचा मानस उराशी बाळगत निःस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन द्वारा प्रत्येक वर्षी वृक्षारोपण दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण केले जाते.. यावर्षी देखील दिनांक १ जुलै २०२२  रोजी हुडकेश्वर (खुर्द), नागपूर येथे वृक्षारोपण करण्यात आले. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हे संतांचे वाक्य खरं करीत संस्थापक सचिन घोडे यांच्या नेतृत्वाखाली वर्षभर पर्यावरणाचे रक्षण कुठल्या ना कुठल्या माध्यमाने केले जाते.

फक्त वृक्ष लावणे हाच संकल्प नसून , लावलेलं प्रत्येक झाड जगविणे हा निश्चयच  अंगी बाळगला आहे. त्याकरिता प्रत्येक झाडामागे त्याच्या देखरेखी करिता एक निःस्वार्थ संयोजक ठेवलेला आहे.आजवर लावलेली २०० ते २५० झाडे संवर्धित झालेली आहे.

यावेळी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून जी.प.सदस्य सुभाष गुजरकर, पं. स.सदस्य वैशाली भोयर, गावच्या सरपंच मीनाताई शेंडे, उपसरपंच अभय भगत,मा. सरपंच कमलाकर शेंडे,ग्रामसेवक चंद्रकांत सोनवाने,खरेदी विक्री संचालक सुरेशजी घोडे,ग्राम सदस्या सिमाताई काष्टे, कृषी अधिकारी सोमाली कृशेकर,समाज सेवक प्रकाश भोयर,उपस्थित होते.त्यासोबतच निःस्वार्थ संयोजक सुमीत मेश्राम,गोपाल हटवार, शुभम हटवार, संकेत घोडे,दिलीप काष्टे,सत्यम मेश्राम,मनिष नवलकर,सुरेंद्र वैघ,विक्की धरमारे,तुषार देशमुख,सौरभ भगत,मयुर धरमारे,डाॅ.वुषाली नवलकर,हर्षाली घोडे,प्रीती गजभिये,पुष्पा बाळबुधे,प्रथमेश काष्टे,हरीश बाळबुधे,प्रशांत घोडे,शंकर ठाकरे,सुरेश वरठी,या सर्वाचे विषेष सहकार्य लाभले..

Latest बातम्या