फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज‘भंगारवाला’ आणि ‘सूर’ यांचा अनोखा मिलाफ

‘भंगारवाला’ आणि ‘सूर’ यांचा अनोखा मिलाफ

Advertisements

विशाल धाकडे याच्या आवाजाने ग्राहकही होतात मंत्रमुग्ध

जागतिक संगीत दिवस विशेष

डॉ.ममता खांडेकर

(Senior Journalist)

२१ जून २०२२: ‘सूर‘ ही देवाची देणगीच असते असे म्हणतात,ती प्रत्येकाला मिळत नसते. ‘सूर’ हे जात-पात,धर्म-पंथ असा भेदभाव करीत नाहीत.विशाल धाकडे हा गुणी गायक देखील याला अपवाद नाही.विशाल हा भंगार व रद्दी जमा करण्याचे काम करतो मात्र त्याच्या गळ्यातले सूर त्याच्या व्यक्तिमत्वाला एक विशिष्ट उंची प्रदान करतात.आपल्या मधाळ व सुरेल सूरांनी तो कायम आपल्या ग्राहकांनाही चिंब भिजवित असतो.

विशाल २००३ पासून भंगार व्यवसायात आहे.व्यवसायानिमित्त तो नेहमीच नरेंद्र नगर येथील श्रीनगर या कॉलनीत येत असतो.रद्दी गोळा करण्याचे त्याचे काम असून या भागातील अनेक ग्राहक हे, विशाल याच्याकडून हमखास गाणी ऐकून घेत असतात.

विशाल याला मिळालेली सूरांची दैवी देणगी याचं त्यांनाही अप्रूप वाटतं.विशाल याचा व्हिडीयो काढून ते व्हॉट्स ॲप ग्रूप्सवर व्हायरल करतात.विशाल याच्या गाण्याच्या चाहत्यांची संख्या त्यामुळे हळूहळू वाढत गेली.आपल्या गाण्यांना रसिकांची मनापासून मिळणारी दाद,यामुळे विशाल ही सुखावतो.

पाच भावंडांमध्ये विशाल हा सर्वात धाकटा.न्यू बाभूळखेडा भागात त्याचे वास्तव्य आहे.वडील ऑटोचलक होते जे अाता हयातीत नाहीत.आई गृहीणी आहे.विशालला जुणी गाणी खूप आवडतात.

मोहम्मद रफी हे त्याचे फेव्हरेट पार्श्वगायक.किशोर कुमार यांची देखील गाणी विशाल आवडीने गातो मात्र प्रेम रफी साहेबांच्या गाण्यावरच जडलं आहे.‘मै कही कवि ना बन जाऊं’या गाण्यात तर विशाल आपलं सर्वस्व अर्पण करतो,त्याला इतकं भावतं हे गाणं.

गाणं हे विशाल याची फक्त आवड आहे.त्यामुळे त्याने कुठेही शास्त्रीय संगीताचे धडे घेतलेच नाही.त्याचा सुरेल आवाज ऐकून मित्र,शेजारी हे आपल्या प्रत्येक कार्यक्रमात त्याला गायनासाठी बोेेलवित असतात.दिवसभरातील आपला व्यवसाय आटोपून विशाल छान तयार होतो आणि कार्यक्रमात पोहोचून, त्याच्या आयुष्याला सुखावणारा माईक जवळ करतो.

करोकेवर सतत गुणगुणत असणा-या विशालच्या संगीतप्रेमामुळे बायको संतापते,असे विशाल हसत सांगतो.त्यांच्या लग्नाला फक्त एक वर्ष झाला आहे.

व्हिक्टर ह्युगो हा जागतिक तज्ज्ञ म्हणतो‘संगीत ते व्यक्त करते जे सांगितले जाऊ शकत नाही आणि ज्यावर गप्प बसणे अशक्य आहे’ तर बरर्थोल्ड ऑरबॅच सांगतो‘संगीत दररोजच्या जीवनाची धुळ आत्मापासून दूर करतो‘विशाल याच्या जगण्याची त-हा बघता हेच खरे,असेच आता म्हणावे लागेल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या