

जामिनावर सुटलेल्या खोब्रागडे भावंडांच्या विरोधात जरीपटका पोलिस ठाण्यात कलम ११० दाखल
‘अल्पवयीन’ मुलगी ही अठरा वर्षांच्या वर:कागदोपत्री पुरावा न्यायालयात सादर
सामूहिक अत्याचाराच्या घटनेला नवे वळण
नागपूर,ता. १५ जून २०२२: एप्रिलच्या २६ तारखेला जरीपटका पोलिस ठाण्यात एका मुलीने सामुहिक बलात्काराची तक्रार नोंदवली होती.तक्रारीच्या आधारावर जरीपटका पोलिसांनी मुलीचा प्रियकर यश कांबळे,यशचे मावस भाऊ ऋषिल(वय वर्षे १९) व रक्षीत(वय वर्षे २१) खोब्रागडे यांना अटक केली.त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.गेल्या पन्नास दिवसांपासून खोब्रागडे बंधू हे मध्यवर्ती कारागृहात होते,काल सायंकाळी पाच वाजता जामिनावर ते कारागृहातून बाहेर येताच पुन्हा खोब्रागडे भावंडांपासून जिविताला धोका असल्याची तक्रार पोलिस आयुक्तांकडे पिडीताच्या कुटुंबियांनी केल्याने कालच मोकळा श्वास घेणा-या खोब्रागडे भावंडांना पुन्हा उद्या जरीपटका पोलिस ठाण्यात हजर राहण्याची सूचना पोलिसांनी केली आहे.
विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी २०२० मध्ये जरीपटका ठाण्यातंर्गत एका अल्पवीयन मुलीवर चार जणांनी सामुहिक बलात्कार केला होता.हा गुन्हा केल्याचा सिद्ध झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चारही गुन्हेगारांना नुकतेच एप्रिलमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणातील पिडीता ही त्या जन्मठेपेच्या गुन्हेगारांपैकी एकाची मावस बहीण असून तिच्या कुटुंबियांच्या दवाबापुढे तिने प्रियकर यश कांबळे याच्यासोबतच, निर्दोष असणारे व यशचे मावस भाऊ असणारे खोब्रागडे बंधूंचे नाव देखील तक्रारीत नोंदवले,परिणामी या घटनेशी कोणताही संबंध नसताना खोब्रागडे बंधूंना जिवनात पहील्यांदा पोलिस ठाणे,न्यायालय,कारागृह,कुख्यात गुन्हेगारांचा वावर,घरची आठवण,अश्रू,निराशा या सर्व अनुभवातून पार पडावे लागले.
यश कांबळे व खोब्रागडे बंधूंच्या विरोधात बलात्काराची तक्रार नोंदविणा-या पिडीतेने आपले वय १७ वर्षे तक्रारीत नोंदवले असून त्या संबंधीचा दाखला तिने पोलिस ठाण्यात जमा केला होता मात्र कांबळे व खोब्रागडे कुटुंबियांनी तिच्या मूळ गावी म्हणजे रामटेकच्या समोर असणा-या गावातील एका शाळेत चौकशी केली असता तीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे निर्दशनास आले.
या संबंधीची माहिती त्यांनी जरीपटका पोलिस ठाण्यात लिखित स्वरुपात दिल्याने पोलिसांनी,पोलिस कर्मचा-यांना पाठवून त्या शाळेतून पिडीतेच्या जन्म तारखेचा खरा दाखला प्राप्त केला व न्यायालयात सादर केला.पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात पिडीता ही अल्पवयीन नसल्याचे सिद्ध झाल्यास या तिन्ही आरोपींच्या विरोधात जरी पोस्कोचा गुन्हा रद्द झाला तरी बलात्कारसारखा गंभीर गुन्हा कायम असणार आहे.
खोब्रागडे बंधूंच्या कुटुंबात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत सामुहिक बलात्कारासारखे क्रूर क्रोर्य घडले असताना व या गुन्ह्यात चार ही गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा झाली असताना या गुन्हेगारापैकी एकाच्या मावस बहीणीने आता फिर्यादींनाच बलात्काराचा आरोपी बनविले असल्याने पाेलिसांसमोरही कायद्याचा पेच निर्माण झाला आहे.
कायदाप्रमाणे बलात्काराची तक्रार नोंदविल्यास आरोपींना आधी अटक करने भाग आहे.ते निर्दोष आहेत की गुन्हेगार हे न्यायालयात सिद्ध होत असतं.परिणामी ज्या खोब्रागडे बंधूंनी कधीही या घटनेतील पिडीतेचा चेहरा ही बघितला नाही,तिच्या फक्त एका तक्रारीवरुन या दोन्ही भावंडांना तब्बल ५० दिवस कारागृहात काढावे लागले.
कारागृहात मुलाखतीच्या वेळेस आपल्या आईशी भेटताच ही मुले ढसाढसा रडत होती.आई काहीही कर आम्हाला येथून बाहेर काढ,असे सांगत होती,आम्हाला तुझी,घरची खूप आठवण येते,या भावंडांना वडील नाहीत,कॅटरिंगच्या कामावर जाऊन घरचा गाढा ओढणारी कष्टाळू आई आणि एक १५ वर्षीय बहीण आहे.या दोघींच्या काळजीने ही भावंडे कारागृहात अतोनात रडत होती,त्यांचे अश्रू बघून आईच्या काळजाचे पाणि-पाणि होत होते,एक दिवस सत्याचा विजय होईल,तुमच्या दोघांवरचे आरोप खोटे सिद्ध होतील,तुम्ही नक्की सूटाल फक्त आपला धीर सोडू नका,असे या भावंडांची जन्मदात्री त्यांना धीर देत राहीली.तिच्या घश्यात कधी घासच उतरला नाही.
काल ही भावंडे घरी येताच त्यांच्यासाठी फक्कड जेवणाचा बेत तिने आखला,तब्बल ५० दिवसांनंतर आईच्या हातचे जेवन या भावंडांना मिळाले होते मात्र त्यांच्या घराजवळच राहणा-या या घटनेतील पिडीतेच्या कुटुंबियांनी,या भावंडांपासून त्यांना जिविताचा धोका असल्याची तक्रार नोंदवली,परिणामी चार भिंतीतलं सुख आणि चार घास सुखाचे, हे सूड भावनेने पेटलेल्या जगाला पाहावले गेले नाही असा टाहो जन्मदात्रीने फोडला.
या घटनेतील पिडीतेच्या मामाने खोब्रागडे बंधूंना हा दम दिला होता की आमची मुले जन्मठेपेत जशी कारागृहात आता सडतील तसे तुम्हालाही सडवल्याशिवाय राहणार नाही!पिडीतेने बलाकाराचा आरोप केला मात्र त्या वेळी रक्षीत हा कमाल चित्रपटगृहात ’केजीएफ’हा चित्रपट मित्रासोबत पाहण्यात गुंग होता तर धाकटा भाऊ ऋषिल हा घरीच होता,दूपारच्या वेळी बलात्काराची घटना घडली असल्याची तक्रार पिडीतेने नोंदवली आहे,परिणामी रक्षीतने आपल्या वकीलांच्या माध्यमातून कमाल चित्रपटगृहातील सीसीटीव्हीचे फूटेज मागण्याची, मागणी केली आहे.
फक्त विशीत असणारी ही दोन्ही भावंडे मोलमजुरी करुन आपल्या आईला आर्थिक हातभार लावत होती मात्र ‘बलात्कारासारखा’अतिशय गंभीर आरोप इतक्या सहजपणे त्यांच्यावर लावण्यात आला,ज्या मुलीचे नख ही या भावंडांनी पाहिले नाही,आता तिच्या फक्त एका आरोपावर,फक्त विशीतल्या या मुलांना स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी स्वत:चे अंर्तमन,समाज,कायदे आणि न्यायालयाशी झगडावे लागत आहे.
मैदानात खेळणारी-बागडणारी ही तरुणाई एका खोट्या आरोपात ५० दिवस कारागृहात राहून आली,कारागृहातील आतील जग जवळून बघून आली.कारागृहात कुख्यात गुंडांना वावरताना या भावंडांनी बघितली,घरची काळजी आणि गुंडांची दहशत अनुभवणारी ही तरुणाई मात्र कारागृह प्रशासनाकडून चांगली वागणूक मिळाल्याची सांगते.
‘बलात्कार’हा एक घृणित अपराध आहे. त्यातल्या त्यात कारागृहात चोरी,दरोडे,हत्या करणा-या गुन्हेगारांना एक वेळ ‘इज्जत’मिळते मात्र जे आरोपी बलात्कारासारख्या आरोपामध्ये कारागृहात येतात त्यांच्याविषयी कट्टर गुन्हेगारांनाही भयंकर चीड व संताप असतो,हे एका अहवालाने सिद्ध झाले आहे.अश्यावेळी आपल्या मावस भावाच्या प्रेयसीने फक्त सूड घेण्यासाठी खोब्रागडे भावंडांना फक्त एका तक्रारीवर कारागृहाची हवा खायला पाठविल्याने ही मुले आतून पार कोलमडून पडली,आता नव्याने नव्या आरोपाखाली त्यांना लिखितमध्ये जरीपटका पोलिस ठाण्यात ’त्यांच्याकडून पिडीतेला व तिच्या कुटुंबियांना कोणताही धोका नाही’हे उद्या लिहून द्यावे लागणार आहे.,व एका नवीन कलम,नव्या आरोपाला सामोरे जावे लागणार आहे.
पिडीतेच्या विरोधात केली जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल-.
या सर्व छळाला कंटाळून आता खोब्रागडे भावंडांच्या आईने ,पिडीतेच्या विरोधात खोटे कागदपत्रे तयार करने व त्यांच्या मुलांना खोट्या अारोपात फसविल्याची तक्रार नोंदवली आहे.या घटनेतील पिडीतेने खोब्रागडे यांच्या घरी येऊन तिच्या मावस भावाविरुद्ध बलात्काराची तक्रार न नोंदविण्यासाठी दबाव आणला होता मात्र त्या घटनेत चारही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला .आता या चारही आरोपींना नुकतेच ९ एप्रिल २०२२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे.
यानंतर लगेच या घटनेतील पिडीतेने बनाव करुन खोट्या आरोपात माझ्या मुलांना फसवले असल्याची तक्रार कोमल खाेब्रागडे या जन्मदात्रीने केली आहे.
या घटनेतील पिडीतेने तिची जन्मतारीख २३ मे २००४ असे नोंदवले आहे मात्र तिची मूळ जन्मतारीख ही २३ जानेवरी २००४ असून ती अल्पवयीन नसून अठरा वर्षे वय उलटलेली असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. केवळ पोक्सोसारख्या कठोर कायद्यात माझ्या मुलांना अडकविण्यासाठी पिडीतेचा खोटा जन्मदाखला या केससंबंधींच्या कागदपत्रांसोबत जोडला असल्याची तकार कोमल यांनी नमूद केली.२४ एपिल २०२२ रोजी खोटी फियार्द नोंदवून पोक्सोअंतर्गत माझ्या मुलांना फसविले असल्याचे त्या सांगतात.
पिडीतेचे वय २३ जानेवारी २०२२ रोजीच अठरा वर्षे उलटल्याने कायद्यातंर्गत ती ‘सज्ञान’ श्रेणीत मोडते व तिने केलेले कृत्य हे भारतीय दंड विधान कलम ४६८,४७१ व ३४ अंतर्गत दंडनीय अपराध आहे,त्यात ३ वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान आहे,परिणामी या पूर्ण प्रकरणाचा निपक्षपातीपणे पुन्हा तपास करुन न्याय मिळवून देण्याची मागी या जन्मदात्रीने आपल्या तक्रारीत केली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
