

नागपूर,दि.१२ जून २०२२: नो कट फिल्म कलेक्टिव्ह च्या ‘अ रायफल अँड अ बॅग‘ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या डॉक्यूमेंटरीचं स्क्रिनिंग रविवारी संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रभाषा प्रचार समिती, रामदासपेठ येथे झाले. ‘अ रायफल अँड अ बॅग’ या डॉक्युमेंटरी मध्ये भारतातील माओवादी गुरिल्ला गट नक्षलवाद्यांसोबत दशकभर लढल्यानंतर ‘सोमी’ आणि तिचे पती नवीन जीवन निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतात.पोलिसांना शरण आल्यानंतर हे दाम्पत्य शिक्षणाच्या माध्यमातून मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी कसे धडपडत आहे हे बघायला मिळालं.
ही डॉक्युमेंटरी क्रिस्टीना हान्स(रोमेनिया), इसाबेला रिनाल्डी (रोम) व आर्या रोठे (भारत ) यांनी दिग्दर्शित केली व त्यांच्यासोबत स्क्रिनिंग नंतर दुरदृष्यप्रणाली द्वारे दर्शकांच्या प्रश्न उत्तरांसाठी चर्चा-सत्र देखील आयोजित करण्यात आले होते ज्या मध्ये रसिकांनी डॉक्युमेंटरीचे संशोधन, चित्रण आदींची पद्धत,त्याला लागलेला वेळ,चित्रित झालेलं दांपत्याचा शोध, नागपूरचं व या डॉक्युमेंटरीचं नातं अश्या विविध विषयांवर उत्सुकतेपोटी अनेक प्रश्न विचारले व तिन्ही दिग्दर्शकांनी तेवढ्याच उत्साहाने त्यांची उत्तरं दिल्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.

यासोबतच ‘अ रायफल अँड अ बॅग’ या डॉक्युमेंटरीचं नागपूरात स्क्रिनिंग होणं ही त्यांच्या साठी कशी महत्वाची गोष्टं आहे हे तिन्ही दिग्दर्शकांनी उपस्थित रसिकांना सांगितले .विशेष म्हणजे सदर डॉक्युमेंटरीचं international Film Festival Rotterdam (IFFR) २०२० मध्ये नुकतंच वर्ल्ड प्रीमियम देखील झालेलं असताना ही डॉक्युमेंटरी नागपूरच्या सिनेरसिकांना बघायला मिळाली ही उल्लेखनीय बाब आहे.
सदर कार्यक्रम हा मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशन,नागपूर यांनी आयोजित केला होता.विशेष म्हणजे प्रत्येक रविवारी ही संस्था, सहजासहजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किंवा प्रत्यक्ष मोठया फिल्म फेस्टिव्हल मध्ये जाऊन बघणं शक्य होत नाही अश्या डॉक्यूमेंटरी,शॉर्ट फिल्म्स चं स्क्रिनिंग आयोजित करीत असते व सिनेरसिकांचाही या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळत असतो.




आमचे चॅनल subscribe करा
