फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमनागपूर शहरातील अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत सराईतांवर लक्ष  वेधा: उपायुक्तांचे निर्देश

नागपूर शहरातील अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत सराईतांवर लक्ष  वेधा: उपायुक्तांचे निर्देश

Advertisements

नागपूर,दि. ९ जून २०२२ : नागपूर जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत बद्दल माहिती देताना पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी सांगितले की, अमली पदार्थांची विक्री रोखण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

नागपूर शहरात अमली पदार्थांची विक्री होणाऱ्या ठिकाणांची माहिती व विक्री आणि पुरवठा करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे व याबाबतचा आढावा घेण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नागपूर यांनी दिले आहे.
विस्फोटक निर्माण करणाऱ्या कंपनीत वापरण्यात येणाऱ्या रासायनिक घटकातून मादक द्रव्यांची निर्मिती करता येते, त्यामुळे विस्फोटके उत्पादन करणाऱ्या कंपनीची नियमित तपासणी करावी अशी सूचना देण्यात आली आहे.

‘डार्कनेट’ व इतर समाज माध्यमातून अमली पदार्थांचे मार्केट चालवण्यात येते, त्यावरही नियंत्रण आणण्याचे कार्य सुरू आहे. याबाबतही बैठकीत चर्चा झाली. डार्कनेट व कुरियरच्या माध्यमातून अमली पदार्थांची मागणी व पुरवठा होणार नाही यासाठी डाक विभागाने विशेष लक्ष द्यावे, विभागांमध्ये येणारे टपाल पार्सल यांची तपासणी करावी व संशयास्पद डाग असल्यास त्वरित जवळील संबंधित पोलिस स्टेशनला कळवावे अशी सूचना देण्यात आली.

नागपूर शहरात खसखस किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही, यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग यांनी नागपूर शहर परिसरात पिकाच्या लागवडीची पाहणी कृषी विभागाकडील कृषी सहाय्यक व महसूल विभागाकडील तलाठी यांच्याकडून करावी. प्रत्यक्ष शेतात जाऊन शासकीय अधिकारी यांनी पिकाची पाहणी करुन नोंदी घ्याव्यात. याबाबत कृषी विभाग व महसूल विभाग यांनी संबंधितांना लेखी आदेश जारी करावे व अवैध लागवड झाल्याची माहिती मिळाल्यास संबंधित पोलिस स्टेशनला सूचित करावे, कारवाईचा अहवाल सादर करावा. अशी सूचना करण्यात आली.

नागपूर शहरातील सामान्य जनतेला अमली पदार्थ व त्यांचे दुष्परिणाम याची माहिती देण्याकरिता नागपूर शहरात व्यापक प्रमाणात जनजागृती अभियान राबविण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी आवश्यक असणारे साहित्य बॅनर पोस्टर पथनाट्य याद्वारे जनजागृती करण्याबाबत सूचना करण्यात आली.

नागपूर शहरात अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे उत्पादन होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच जे कारखाने बंद आहेत यावर विशेष लक्ष ठेवावे या साठी अन्न व औषध विभाग व कामगार विभागाची एक चमू नेमून अश्या रासायनिक कारखान्यांची तपासणी दर महिन्याला करावी. याबाबतचा अहवाल नागपूर ग्रामीण येथील पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आणि सादर करावा, अशी सूचना देण्यात आली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या