Advertisements


– नागपूर नागरिक सहकारी बँक व मैत्री परिवार संस्थेचा संयुक्त उपक्रम
नागपूर, २० मे : मैत्री परिवार संस्था व नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारत: काल, आज आणि उद्या’ विषयावर शनिवार, २१ मे रोजी सांयंकाळी ६.३० वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शिक्षक सहकारी बँकेचे सभागृह, गांधीसागर येथे होणा-या या कार्यक्रमात राष्ट्रीय विचारांचे अभ्यासक, सावरकर साहित्य प्रेमी व ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते शरद पोंक्षे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या गौरवशाली राष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी, वर्तमानातील आव्हाने आणि भविष्यातील नवनव्या संधीचे आकलन व्हावे, या उद्देशाने या ओजस्वी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मैत्री परिवार संस्था व नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी म्हटले आहे.
नागपूर नागरिक सहकारी बँक आणि मैत्री परिवार संस्थेच्या पुढाकारातून आजवर नागपुरात विविध राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांवर स्वतंत्र आणि संयुक्त पुढाकारातून व्याख्यानमालांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून त्यात सरसंघचालक मोहनजी भागवत, उपराष्ट्रपती डॉ. अन्सारी, अर्थक्रांती प्रतिष्ठानचे यमाजी मालकर, बंगलोरचे युवा खासदार तेजस्वी सुर्या आदी वक्त्यांनी या व्याख्यानमालेत आपल्या ओजस्वी वक्तृत्वाने सहभाग नोंदवला आहे.
शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाला राष्ट्रभक्त नागरिकांनी १० मिनिटे आधी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर नागरिक सहकारी बँक आणि मैत्री परिवारचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांनी केले आहे.
Advertisements

Advertisements

Advertisements


आमचे चॅनल subscribe करा
