Homeनागपूर न्यूजगडकरींच्या घरी विकासकामावर चर्चा :अजित पवार

गडकरींच्या घरी विकासकामावर चर्चा :अजित पवार

Advertisements

गडकरींचा निरोप: उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांसोबत पार पडली बैठक

नागपूर,ता.२९ एप्रिल २०२२: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे नागपूरात भरगच्च कार्यक्रमासाठी आज आले असता अचानक सावनेरवरुन सायंकाळी परतताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना त्यांच्या घरी विकास कामांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले परिणामी पूर्व नागपूरातील एका नियोजित लोकार्पण सोहळ्यात तब्बल तीन तास उशिरा पोहोचलेल्या या मान्यवरांनी उशिरा येण्यासाठी दिलगिरी व्यक्त करतानाच गडकरींनी घरी बैठकीसाठी बोलावले असल्याने व गडकरींकडेही रात्री ८ पर्यंतच वेळ उपलब्ध असल्याने पूर्व नागपूरातील नियोजित कार्यक्रमाला अतिशय विलंब झाला असल्याची माहिती अजित पवार यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच तसेच कार्यक्रमानंतर माध्यमांजवळ दिली.

गडकरी यांनी महाराष्ट्राच्या विकास कामाविषयी महत्वाचे बोलायचे असल्याचा निरोप दिल्याने त्यांच्याकडे जाने गरजेचे असल्याचे ते म्हणाले.गेल्या वर्षी केंद्र सरकारकडून राज्याला ‘सेंट्रल रोड फंड’प्राप्त झाला असून त्यात ६०० कोटी भारतीय जनता पक्षाचे आमदार तसेच ६०० कोटी आघाडी सरकारच्या आमदारांना द्यायचे असल्याचे गडकरी म्हणाले.याचा अर्थ महाराष्ट्रात १२०० कोटी येतात आहे,महाराष्ट्रातील रस्त्यांचा विकास होत आहे त्यामुळे आम्ही गडकरी यांच्याकडे भेटीला जाण्याची मान्यता दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

आता नवे आर्थिक वर्ष एप्रिल पासून सुरु झाले असल्याने आम्ही गडकरींना ही देखील विनंती केली की या ही वर्षी असाच निधी महाराष्ट्राला केंद्राकडून मिळवून द्यावा.हा निधी तुमच्याही आमदारांना द्यावा आमच्याही आमदारांना मिळावा.शेवटी आमदार हा आपला निधी हा मतदारसंघाच्या विकासासाठीच खर्च करु शकतो.गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र हा निधी रेल्वे ओवर ब्रिज(आरओबी)आणि रेल्वे अंडर ब्रिज(आरयूबी)साठी देखील देत असतो.यासाठी देखील गडकरींनी कामे सुचवण्यास सांगितले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

गडकरींसाेबतची चर्चा ही महाराष्ट्राच्या विकासावरील महत्वाची चर्चा होती,अशी पुश्‍ती अजित पवार यांनी जोडली.

Latest बातम्या