

वाहनचालकांसाठी बांधकाम शेजारीच ६ मिटरचे रस्ते
वाहनधारकांनी अधिसूचनेचे पालन करावे
नागपूर दि. १९ : वाडी कंट्रोल ते अशोक मोटर्स अमरावती रोड व आरटीओ ते लॉ कॉलेज चौक येथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. मुख्य रस्त्यावरील ही वाहतूक बांधकामामुळे थांबू नये, यासाठी कंत्राटदारांना बांधकामात शेजारीच सहा मीटरचे रस्ते तयार करण्याचे निर्देश दिले असून या ठिकाणावरून धीम्या गतीने वाहतुकीचे वहन वाहनधारकांनी करावे, असे आवाहन वाहतूक शाखेच्या उपयुक्त कार्यालयाने केले आहे.
नागपूर शहरातील अधिक वाहतुकीचा रस्ता असणाऱ्या अमरावती रोड वरील वाडी कंट्रोल ते अशोक मोटर्स अमरावती रोड तसेच आरटीओ ते लॉ कॉलेज चौक येथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम पुढील दोन महिन्यात पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी या ठिकाणावरून जाणारी वाहतूक वळविण्यात येणार नाही. या बांधकामाचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीला आरटीओ ते लॉ कॉलेज चौक बांधकाम दरम्यान, दोन्ही बाजूला सहा मीटरचा रोड वाहतुकीस मोकळा राहणार आहे. त्यामुळे वाहतूक वळविण्याची आवश्यकता भासणार नाही.
कंत्राटदारांनी सुरळीत व सुरक्षित वाहतूक नियमन करिता आवश्यक वाहतूक सुरक्षा रक्षक नेमावे,स्केटिंग करण्यात यावी, कामासंबंधी सूचना फलक लावावे, रात्रीच्यावेळी एलईडी लावावी, वळण रस्त्याचे फलक व इतर आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, असे बजावण्यात आले आहे.
कंत्राटदारांना १९ तारखेच्या अधिसूचनेद्वारे १९ एप्रिल ते १८ मे पर्यंत मर्यादित काळासाठी ही अधिसूचना राहणार आहे, तसेच नागरिकांनी व शहरातील वाहनचालकांनी याआधी सूचनेचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००

आमचे चॅनल subscribe करा