

नागपूर,१६ एप्रिल २०२२: संरक्षण दलात मुलींनाही संधी उपलब्ध आहे. त्यामुळे मुलींनी त्या दिशेने विचार करायला हवा. पालकांनीही आपल्या पाल्यांना त्यांचे करिअर स्वत: त्यांनाच निवडण्यासाठी प्रोत्साहित करावे. या सत्कार कार्यक्रमातून माझे सर्व लहान मुला-मुलींना आवाहन आहे की त्यांनी परिश्रम पूर्वक अभ्यास करून आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करावे व देशसेवेसाठी आपल्या शिक्षणाचा वापर करावा. असे प्रतिपादन प्रियंका संतोष खांडेकर यांनी केले.
जयंती नगरी – ५, बेसा येथील क्लब हाऊसमध्ये आयोजित महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोह प्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून त्या बोलत होत्या. नुकतीच त्यांची इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनेंट तर इंडियन एयर फोर्समध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे, हे विशेष.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहायक पोलिस आयुक्त संतोष खांडेकर, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता बी. सी. माटेगडीकर प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी जयंती नगरी – ५ मधील रहिवाशांच्या वतीने प्रियंका संतोष खांडेकर यांचा शिल्पा अजय ढोके यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चिमुकल्या मुलांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. महेंद्र शामकुल, प्रस्तावना प्रा. अनिल बनकर, पाहुन्यांचा परिचय डॉ प्रमोद खोब्रागडे, बक्षीस वितरण संचालन पुष्पा गजघाटे, आभार प्रदर्शन रत्ना तायड़े यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीटेसाठी अजय ढोके, प्रमोद देशभ्रतार, आनंद बैग, आशीष टेम्बरे, पी. जे. सोंडवले, दिलीप गजघाटे, संजय म्हेसकर, संतोष तायड़े, तिक्षा शामकुल, संगीता उमाळे, रेखा भोगे आदिनी केले.

आमचे चॅनल subscribe करा