Homeनागपूर न्यूजसुदामा चित्रपटगृहासमोर प्रेक्षकांची तूफान नारेबाजी: ’हमे इंसाफ चाहीये’चे नारे

सुदामा चित्रपटगृहासमोर प्रेक्षकांची तूफान नारेबाजी: ’हमे इंसाफ चाहीये’चे नारे

Advertisements

मी वसंतराव’च्या साढे नऊच्या शो ला गडकरींमुळे दीड तास उशिर:प्रेक्षकांचाही संयम संपला

गडकरींनी अभिनंदनपर भाषण घेतले आटोपते:आयोजकांच्या नियोजनाचा बोजवारा

नागपूर,ता.१६ एप्रिल २०२२: सुदामा चित्रपटगृहात आज शनिवार दि.१६ एप्रिल रोजी सायंकाळी साढे सहा वाजताचा शो नागपूरातील सुप्रसिद्ध उद्योजक आशुतोष शेवाळकर यांच्यातर्फे खास निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. नागपूरकरांसाठीचा अस्सल अभिमान असणारा ’मी वसंतराव’हा पंडीत वसंतराव देशपांडे यांच्या जिवनप्रवासावर आधारित चित्रपट आहे.या चित्रपटाची उत्सुकता राज्यातील इतर शहरासारखीच उपराजधानी नागपूरातील प्रेक्षकांना देखील आतुरतेने होती.साढे सहा वाजताचा शो हा निमंत्रितांसाठी राखीव असल्याने साढे नऊ वाजताच्या शो चे बुकिंग हाऊसफूल झाले होते मात्र साढे दहाचा ठोका झाला तरी प्रेक्षकांना आत साडले जात नसल्याने प्रेक्षकांनी जोरजोरात नारेबाजी सुरु केली.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व त्यांच्या पत्नी कांचन गडकरी हे विशेष निमंत्रित चित्रपटगृहाच्या आत चित्रपटाचा आनंद घेत असल्याने साढे नऊ वाजताचा शो वेळेवर सुरु होऊ शकला नसल्याचे कळताच प्रेक्षकांनी ’हमे इंसाफ चाहीये’ व ’जय श्रीराम’च्या ना-यांनी सुदामा चित्रपटगृहा दणाणले. सुदामा समोर दहा वाजतापासून जोरजोरात नारे लावण्यास सुरुरवात केली.

विशेष म्हणजे गडकरी हे नियोजित वेळवर अर्थात सायंकाळी ६.३० वाजता चित्रपटगृहात न पोहोचता उशिरा पोहोचले.ते येण्यापूर्वी १ तासाचा चित्रपट दाखवून झाला होता.मात्र गडकरी सपत्नीक हजर झाल्यानंतर चित्रपट पुन्हा सुरवातीपासून पडद्यावर झळकवण्यात आला परिणामी ९.३० वाजता चित्रपट वेळेवर सुटला नाही,परिणामी प्रेक्षकांचा देखील संयम सुटला.अनेक प्रेक्षक हे लहान मुले यांना घेऊन आले होते.९.३० ते १२.३० अश्‍या नियोजित वेळेचा अंदाज बांधून प्रेक्षक हे सहकुटुंब महिला व मुलांसह सुदामा चित्रपटगृहात पोहोचले होते मात्र १०.३० वाजले तरी त्यांना चित्रपटगृहात प्रवेश करता आला नाही.

११ वाजता त्यांना चित्रपटगृहात प्रवेश देण्यात आल्याने मध्यरात्री २ वाजता प्रेक्षकांना घर गाठावे लागणार होते.परिणामी लहान मुलांसाेबत आलेले अनेक कुटुंबिय हे सुदामा समोरील डिव्हायडरवर डोक्यावर हात ठेऊन बसली होती तर तरुणांनी सुदामा समोर जोरदार नारेबाजी केली.

तरुणांचा राेष हा राजकीय नेत्यावर चांगलाच बरसला.तिकीट विकत घेऊन वेळेवर शो बघण्यास पोहाचणारे प्रेक्षक यांना एखाद्या राजकीय नेता चित्रपटगृहात चित्रपटाचा आनंद घेत असल्याने वेळेवर शो बघता येणार नाही हे कळताच त्यांचा रोष फूटून निघाला.

आयोजक आशुतोष शेवळाकर यांनाही ही परिस्थिती आटोक्यात आणने शक्य झाले नाही.९.३० वाजताच्या शो चा प्रेक्षक रात्री ११ वाजता देखील चित्रपटगृहाबाहेर नारेबाजी करीत ’तातकळत’उभा आहे,याचे भान ठेऊन गडकरी यांनी अवघ्या दोन मिनिटात आपले चित्रपट व चित्रपट कलावंतांविषयी अभिनंदनपर भाषण आटोपले.

चित्रपटगृहात यावेळी चित्रपट निर्माते गोखले,कलावंत राहूल देशपांडे,अमिता दाते आदी कलावंत उपस्थित होते.गडकरींसाठी चित्रपट पुन्हा पहील्यापासून सुरु करण्यात आला आणि तिथेच पुढील शो चे नियोजन बिघडले.

विशेष म्हणजे या वेळी तिकीट खिडकीवर तिकीटा विकल्या जात असतानाही प्रेक्षकांना, शो रात्री ११ नंतर सुरु होईल अशी कल्पना देण्यात आली नसल्याचे अनेक प्रेक्षकांनी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना सांगितले.

Latest बातम्या