फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमकारच्या डिक्कीत आढळला ‘नग्न मृतदेह’:संशयावरुन दोघे चौकशीसाठी ताब्यात

कारच्या डिक्कीत आढळला ‘नग्न मृतदेह’:संशयावरुन दोघे चौकशीसाठी ताब्यात

Advertisements

नागपूर,१५ एप्रिल २०२२: एका भंगारवाल्याने स्क्रॅप करण्यासाठी विकत घेतलेल्या एका कारच्या डिक्कीमध्ये एका इसमाचा संपूर्ण नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माहिती मिळताच तहसील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयोमध्ये पाठवला. मृतदेहाची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी कार विकत घेणा-या दोघा भंगारवाल्या भावंडांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौशाद शाह कय्यूम आणि त्याचा भाऊ अज्जू हे तहसील पोलीसठाण्याच्या हद्दीत रेल्वेलाईनला लागून असलेल्या गार्डलाईन परिसरात भंगारचा व्यवसाय करतात. ८ दिवसांपूर्वी त्यांची एक एमएच ३१/ सीएम ०७४४ क्रमांकाची ब्लॅक शेवरोले स्क्रॅप करण्यासाठी खरेदी केली होती. गेल्या काही दिवसांपासून ती पडून होती. शुक्रवारी त्यांनी ती कार स्क्रॅप करण्यासाठी घेतली असता त्यातून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी डिक्की उघडून बघितली असता त्यांना संपूर्ण नग्नावस्थेत असलेला एका इसमाचा मृतदेह आढळला. त्यांनी याची माहिती तहसील पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयोमध्ये पाठविला. मृतदेहाच्या अंगावर कपडे नसल्याने तसेच त्याच्या आजुबाजुला ओळख पटेल असे काहीच नसल्याने तो कोण? तसेच नौशाद शाह कय्यूम आणि त्याचा भाऊ अज्जू यांनी ती कार कोणाकडून घेतली याचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान भंगारचा व्यवसाय करणा-या या दोघांची गुन्हगारी पार्श्वभूमी असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या भंगारवाल्यांचा शहरातील कुख्यात इप्पा गॅँगशी संबंध असल्याने पोलिस त्या दिशेने तपास करीत आहे. उल्लेखनीय म्हणजे गार्डलाईन परिसरात मोठ्याप्रमाणात चारचाकी वाहने स्क्रॅप करण्यासाठी येतात. त्यात अधिकांश चोरीची असतात अशी माहिती आहे. मृतदेहाची कुजलेली अवस्था पाहून ३ ते ४ दिवसांपूर्वी इसमाचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा कयास आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या