Homeनागपूर न्यूजकोल वॉशरी घोटाळ्यात बावणकुळेंचा सरळ सहभाग:प्रशांत पवार यांचा आरोप

कोल वॉशरी घोटाळ्यात बावणकुळेंचा सरळ सहभाग:प्रशांत पवार यांचा आरोप

Advertisements

महजनकोतील संपूर्ण गौडबंगालाशी बावणकुळे परिचित
नागपूर,ता.८ एप्रिल २०२२: वॉश केलेला कोल आणि साध्या कोळश्‍याचा वावराने वीज निर्मितीत कुठलाही फरक पडत नाही,हे महावितरणच्या अधिका-यांनीच माहिती अधिकारात कायद्यांतर्गत दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले मात्र या कोल वॉशचे पाच वर्षांचे कंत्राट २०१९ मध्ये माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनीच कोल वॉशरीज ऑपरेर्ट्सना दिले होते,वीज निर्मितीसाठी कोळशा धुण्याची फारशी गरज नसतानाही बावणकुळे यांनी याचे कंत्राट चक्क पाच वर्षांसाठी कशासाठी खासगी कंपन्यांना दिले?

गेल्या एक वर्षापासून ’जय जवान जय किसान’संघटना कोट्यावधी नव्हे तर अब्जावधीच्या या भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने पत्र परिषदा घेत आहे व जनतेसमोर तथ्य मांडत आहे.कोल वॉशरीजच्या माध्यमातून चक्क चांगल्या प्रतिच्याच कोळश्‍याचीच तस्करी महाजनकोचे दोन अधिकारी करीत आहेत ,बावणकुळे हे नेहमीच उर्जा मंत्रालयाच्या कारभारावर ताशेरे ओढतात,यावर चांगलंच तोंडसुख घेतात मात्र बावणकुळेंना महाजनकोमधील हा एवढा मोठा घोटाळा दिसत नाही का?त्यांनीच आता वीज ग्राहकांना सांगावे की कोल वॉशरीजचं काय काम आहे आणि असा कोळसा धुतल्याने वीज निर्मिती किती पट वाढली?आमच्या जवळ जी काही कागदपत्रे आहेत त्यावरुन स्पष्टपणे अधोरेखित होतं की धुतलेला कोळसा वापरल्याने एक टक्का देखील वीज निर्मितीत भर पडत नाही तरी देखील कोल वॉशरीजचा कंत्राट पाच वर्षांसाठी का देण्यात आला?यावर बावणकुळे काहीच बोलत नाहीत त्यामुळेच आमचा सरळ-सरळ माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यावरच आरोप आहे की त्यांनीच त्यांच्या मंत्री पदाच्या काळात कोल वॉशरीज कंपन्यांना महाजनकोत व राज्यातील वीज ग्राहकांच्या डोक्यावर आणून बसवले,त्यांचा या संपूर्ण भ्रष्टाचारात सरळसरळ हात असल्याचा आरोप म्हणून आम्ही छातीठोकपणे करीत असतो,असा दावा राष्ट्रवादीचे नेते व ’जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्र परिषदेत केला.

एवढंच नव्हे तर दहा वर्षांपूर्वी ज्या कोल वॉशरीज कंपन्या यांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते त्यांच्याच कार्यालयातून आता कंत्राट देण्यात आलेल्या कोल वॉशरीज कंपनींचा संपूर्ण कारभार चालतो.या नव्या कंपन्या आहेत की जुनेच लाेक नाव बदलून कोळश्‍याची लृृृृृृट करीत आहे?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.आज महाराष्ट्रात वीज टंचाईला महाराष्ट्राचा वीज ग्राहक समोर जात आहे.अनेक भागात ऐन उन्हाळ्यात वीज कपात केली जात आहे.लोड शेडिंग करण्याचं कारण हे कोळसा उपलब्ध नसल्याचं सांगितल्या जातं.मात्र कोल वॉशरीजच्या माध्यमातून तब्बल वीस टक्के कोळसा खुल्या बाजारात विकल्या जात आहे त्याचे काय?तो कोळसा पॉवर प्लान्टमध्ये का दिला जात नाही?

ज्या दिवशी बावणकुळे हे आवाहान करतील की रिजेक्ट कोल हा महाजनकोने खुल्या बाजरात विकायला पाहिजे त्यावेळी आम्ही समजू की यात कोणाचाही कट नाही,नाहीतर आम्ही हे समजू माजी उर्जामंत्र्यांपासून यात अनेकांचा कट आहे,असा थेट आरोप याप्रसंगी प्रशांत पवार यांनी केला.

बाहेर हा रिजेक्ट कोल दहा हजार रुपये टन विकल्या जात असून यात हजार रुपये टन कोणाची टक्केवारी आहे?यात अनेक अधिकारी देखील सहभागी आहेत.रेल्वे,ट्रांसपोर्टर,एमएसएमईचे अधिकारी हे देखील यात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला.कोल वॉशरीज ऑपरेटरला ५ हजार टन टक्केवारी देऊन पाच हजार टनचा मलिदा वाचत असेल तरी देखील त्याची ‘बल्ले बल्ले‘आहे.महाजनकोने कोल वॉशरीज ऑपरेर्ट्सला कोळशा धुण्याचे काम देणे बंद करावे,रिजेक्ट कोळसा महाजनकोने खुल्या बाजारात विकावा पण ते असं करणार नाहीत कारण त्यांनी आधीच ‘कमिशन’ घेऊन घेतलं आहे.ही जबाबदारी बावणकुळे यांची आहे की त्यांना माहिती आहे कोल वॉशरीज म्हणजे काय?धुतलेल्या कोळशाचा वीज निर्मिती वाढ करण्यासाठी किती फायदा होतो?प्रसार-प्रचार माध्यमे बावणकुळे यांना हा प्रश्‍न का विचारत नाही?पाच वर्ष ते उर्जा मंत्री पदावर होते,त्या पूर्वी दहा वर्ष ते आमदार होते,त्यांना जेवढा अनुभव महाजनकोचा आहे तेवढा कोणत्याच उर्जा मंत्र्यांना नाही कारण ते आधी तिथेच काम करीत होते,मी देखील तिथे काम करायचो,ते आपल्या नावावर काम करीत होते मी माझ्या नावावर काम करायचो.

त्यामुळेच महाजनकोमध्ये कोणती ‘उलटी-सरळ’ कामे होतात हे त्यांना ही माहिती आहे मला देखील माहिती आहे.विदर्भातील कोळसा नावाच्या नैसर्गिक खनिज संपत्तीची जी प्रचंड लृट होत आहे ती थांबावायची जबाबदारी बावणकुळे यांचीच आहे.ते नेहमीच पत्रकारांना बाईट देत असतात,महाजनकोच्या भ्रष्टाचाराबाबत बोलत असतात,किमान मिडीयाने तरी त्यांना याबाबत प्रश्‍न विचारला पाहीजे की कोळसा धुण्यासाठी त्यांनी ते उर्जा मंत्री असताना निवडणूकीच्या वर्षात म्हणजे २०१९ मध्ये एवढ्या तातडीने ऑपरेर्ट्सला का आणले?यात जनतेचा किंबहूना वीज ग्राहकांचा कोणता फायदा होता?

विद्यमान उर्जा मंत्री नितीन राऊत यांना देखील आम्ही कागदपत्रे दिली मात्र महाजनकोचा अधिकारी पुरुषोत्तम जाधव हा नितीन राऊत यांना चुकीचे मार्गदर्शन करीत आहे तरी देखील आम्ही राऊतांना प्रत्यक्ष भेटून याबाबतचे सर्व पुरावे देणार आहोत,असे पवार म्हणाले.राऊत यांनी ‘रुखमाई’या कोल वॉशरीज ऑपरेटरची संपूर्ण चौकशी आपल्यास्तरावर करावी,ही कोणाची आहे ’रुखमाई?’रुखमाईला कोल वॉशरीजचा अनुभव आहे का?याच रुखमाईचा ट्रक पकडल्या गेला होता ना?चांगल्या प्रतिचा कोळसा खुल्या बाजारात विकण्यासाठी घेऊन जाताना व निकृष्ट प्रतिचा कोळसा पॉवर प्लॅन्टमध्ये पाठवला जात असताना, तरी देखील अश्‍या भ्रष्टाचारी कोल वॉशरीज ऑपरेर्ट्स सोबतचा संपूर्ण पाच वर्षांचा करार विद्यमान उर्जा मंत्री कायम का राहू देत आहेत?असा प्रश्‍न पवार यांनी उपस्थित केला.

Latest बातम्या