फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसमर्पित कार्यकर्ता तुषार ठावरेंच्या स्मृतीप्रित्यर्थ पाणपोई सेवा

समर्पित कार्यकर्ता तुषार ठावरेंच्या स्मृतीप्रित्यर्थ पाणपोई सेवा

Advertisements

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त जोपासली सामाजिक जाणीव

नागपूर, ता. ६ : उन्हात घामेजूनी अंगाची होतीया लाहीलाही,सूर्य किरणांची लागती उष्णगरम झळाई,आठवते दग्ध उन्हातली थंडगार सराई,वटवृक्षाच्या सावलीत थाटलेली पाणपोई’असं एक मराठी शायर सांगून गेला आहे.नागपूरच्या तप्त उन्हात जिथे एप्रिल-मे महिन्यात अंगांची लाहीलाही होते,उष्ण वारा देहाला दग्ध करुन जातो,घामाच्या धारांनी घश्‍याला सारखीसारखी कोरड पडते,तृष्णेनी व्याकूळ नजर पाणपोई शोधू लागते अश्‍यावेळी पाणपोई नजरेस पडताच व्याकूळ मन तिथे धाव घेतं,थंडगार पाण्याने देहाची काहिली आणि मनाची तृष्णा जेव्हा भागते तेव्हा माणूस म्हणून आपोआप ‘कर तिथे जुळतात’.असाच एक उपक्रम आज बुधवारी (ता.६) लक्ष्मीनगर येथील पिझ्झा हट पुढे पाणपोईच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात आला.

भारतीय जनता पार्टी लक्ष्मीनगर परिसरातील कार्यकर्ता, पदाधिकारी तुषार ठावरे यांचे दुर्दैवाने कोरोनामध्ये निधन झाले. ते रामनवमीच्या शोभायात्रेमध्ये लक्ष्मीनगर पिझ्झा हटपुढे नियमितपणे अनेक वर्ष ताक वितरण करीत होते. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त तुषार ठावरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याच ठिकाणी पाणपोईची सेवा सुरू करण्यात आली.

माजी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून निःश्वार्थ समर्पण भावनेने पक्षाची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याला सामजिक जाणीव जोपासून श्रद्धांजली वाहण्यात आली.

भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम नागपूरच्या कार्यकर्त्यांद्वारे पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या कार्याचा हा सन्मान प्रत्येक सदस्याला सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी माजी महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केला

.यावेळी माजी महापौर संदीप जोशी, प्रभाग ४० चे संयोजक  विवेक तरासे, माजी नगरसेवक गोपाल बोहरे, महेंद्र भुगांवकर, मनोज देशपांडे, शंतनू येरपूडे, राजेंद्र मुंडले, दीपक वानखेडे , मंगेश उपासनी, राजू कुलकर्णी, जयंता आदमने, अजय डागा, कौस्तुभ खांडेकर, मनीष जैन, आशिष पुसदकर, अमोल वटक, राजीव रोडी, चैतन्य दवंडे, प्रकाश चांद्रायन, शंतनू मोहोड, कृष्णा काकडे, सुनील कलंत्री अमित कुथे धीरज लिकुरवाडे आदी उपस्थित होते

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या