Homeनागपूर न्यूजयुवकांच्या सबलीकरणात फॉच्र्यून फाऊंडेशनचा पुढाकार: पाच हजार जागांसाठी होणार मुलाखती

युवकांच्या सबलीकरणात फॉच्र्यून फाऊंडेशनचा पुढाकार: पाच हजार जागांसाठी होणार मुलाखती

Advertisements

२५ मार्चपासून युथ एम्पावरमेंट समिटचे आयोजन

नागपूर,२३ मार्च २०२२: जगातील युवादेश म्हणून ओळखल्या जाणा-या भारतातील युवक मोठ्या संख्येने सुशिक्षित आणि कौशल्याधारीत शिक्षणाने समृद्ध होत आहेत. बदलत्या जागतिक समीकरणांच्या पाश्र्वभूमीवर, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आता भारतात आपले पाय भक्कमपणे रोवत आहेत. रोजगारक्षम युवक आणि सक्षम कंपन्यांची सांगड घालून देण्याचे महत्कार्य फॉच्र्यून फाऊंडेशन गेल्या सात वर्षांपासून सातत्याने करीत आहे. यावर्षीदेखील, फॉच्र्यून फाऊंडेशनच्या वतीने, येत्या २५ मार्च २०२२ शुक्रवारपासून युथ एम्पवारमेंट समिट २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.

फॉच्र्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.अनिल सोले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या दूरदर्शी उपक्रमाचे यंदा आठवे वर्ष आहे. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग अर्थात एमएसएमई, इंजिनियरींग कॉलेज प्लेसमेंट असोसिएशन म्हणजे ईसीपीए आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने, उद्यमशील युवकांचा हा महामेळावा आयोजिण्यात आला आहे.

शुक्रवार २५ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजता, युथ एम्पावरमेंट समिटचे उद्घाटन केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आमदार निवास, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे होणार आहे.

उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, माजी खासदार दत्ता मेघे, लोकमत एडीटोरीअल बोर्डचे अध्यक्ष विजय दर्डा, खासदार डॉ.विकास महात्मे, उद्योगपती सत्यनारायण नुवाल, माजी खासदार अजय संचेती, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ए.एस.अ‍ॅग्री अ‍ॅण्ड अ‍ॅक्वा एलएलपीचे अध्यक्ष डॉ.प्रशांत झाडे यांची उपस्थिती राहणार आहे. तर, महापौर दयाशंकर तिवारी, उद्योगपती अतुल गोयल, राजेश रोकडे, प्यारेखान, अरुण लखानी, माजी आमदार डॉ.गिरीश गांधी, गिरीश व्यास, एमएसएमईचे संचालक प्रशांत पार्लेवार, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक संतोष एस., वेकोलीचे सीएमडी मनोज कुमार, मॉईलचे सीएमडी मुकुंद चौधरी, विदर्भ इन्फोटेक प्रा.लि.चे प्रशांत उगेमुगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिवाय, स्थानिक प्रतिनिधी आणि समाजातील मान्यवरांची उद्घाटन समारोहाला उपस्थिती राहणार आहे.

रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देणाèया, युथ एम्पावरमेंट समिटमध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मान्यवरांचे प्रेरक मार्गदर्शन, परिसंवाद, सरकारी महामंडळ आणि खासगी योजनांच्या स्टॉल्ससह अनेक मशिनरीजचा प्रदर्शनात समावेश राहणार आहे. शिवाय, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आणि मुद्रा लोन योजनेंतर्गत सर्व बँकांद्वारे मार्गदर्शन शिवाय, नोकरीसाठी प्रत्यक्ष मुलाखती असे संधींचे भांडार युवावर्गााठी खुले होणार आहे.

लक्षात ठेवा…
दिनांक : २५,२६ आणि २७ मार्च २०२२
स्थळ : आमदार निवास, सिव्हील लाईन्स, नागपूर

अशी करा नोंदणी-
युथ एम्पावरमेंट समिट तीन दिवस म्हणजे २५, २६ आणि २७ मार्च २०२२ रोजी आयोजित असून, शेकडो कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पाच हजार जागांसाठी ऑफलाईन मुलाखती होणार आहेत. युवक-युवतींनी नोंदणी करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून, येस नागपूर फॉच्र्यून फाऊंडेशनअ‍ॅप (YESNAGPUR(Fortune Foundation)APP) डाऊनलोड करावे. तसेच, www.anilsole.in/www.yesnagpur.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. उमेदवार अधिक माहितीसाठी ८७९९९३०२५३ या क्रमांकावर संपर्क करू शकतात. ऑनलाईन नोंदणी २६ मार्च दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहील. उमेदवारांना वेळोवेळी अ‍ॅपच्या माध्यमातून सूचना देण्यात येतील. रोजगारइच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने या आयोजनाचा लाभ घ्यावा आणि नावनोंदणी करावी, असे आवाहन फॉच्र्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Latest बातम्या