फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज'देसी गर्ल’ च्या गीतांना नागपूरकरांची ‘क्रेझी किया रे’ची दाद

‘देसी गर्ल’ च्या गीतांना नागपूरकरांची ‘क्रेझी किया रे’ची दाद

Advertisements

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा दुसरा दिवस सुनिधी चौहाने गाजवला

नागपूर, २० मार्च २०२२: हरफनमौना गायिका,गजबची गायिका,चुलबुली,शरारती आवाजाची गायिका म्हूणन सिनेजगतात जिची ओळख आहे,प्रियंका चोपडा,काजोल,उर्मिला मातोंडकरयासारख्या अभिनेत्रींसाठी जिने लोकप्रियेच्या सोपाणावर पोहोचलेल्या गीतांचे पार्श्वगायन केले त्या गायिकेच्या खासगी आयुष्यात अनेकांसारखाच पराकोटीचा संघर्ष ही आला होता,फार कमी वयात सुनिधी चौहान नावाच्या वादळाने सिनेजगतात जी प्रसिद्धी,लोकप्रियता मिळवली ते इतरांसाठी फक्त स्वप्नवत असतं. १९९६ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित देशातील पहिला रिएलिटी शो  ’मेरी आवाज सुनाे’ची ती पहीली विनर.

वयाच्या सोळाव्या वर्षीच सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक रामगोपाल वर्माच्या चित्रपटात गाण्याची संधी ही मिळाली मात्र वयाच्या अठराव्या वर्षीच कोरिओग्राफर व दिग्दर्शक बॉबी खानसोबत प्रेमविवाह केला मात्र हे लग्न फक्त १ वर्ष टिकलं.बॉबी खान सुनिधीपेक्षा १४ वर्ष वयाने मोठा होता.दोघांनी मिळून ‘पहीला नशा’हा अल्बम लाँच केला होता आणि येथूनच त्यांच्यात प्रेमाचा अंकूर फूलला.आयुष्य समजण्याचं वय नसतानाही आपल्या खासगी जिवनात या महान गायिकेने आयुष्यातील धगधगते वास्तव अनुभवले,पचवले आणि ती ‘धग’ आपल्या सुरात उतरवली.वयाच्या २८ व्या वर्षी २०१२ मध्ये सुनिधीने पुन्हा नव्याने आयुष्याचं भरभरुन स्वागत केलं आणि आपला लहानपणीचा मित्र व संगीत दिग्दर्शक हितेश सोनीसोबत लग्न केलं.२०१८ मध्ये ही महान गायिका एका गोंडस मुलाची आई झाली.एक गायिका,एक प्रेयसी,एक पत्नी ,एक आईची सगळी रुपे जणू सुनिधीच्या सूरांमध्ये उतरली,आज सुनिधीच्या गीतांवर तिच्या अवाजाचा चाहता वर्ग ‘क्रेजी किया रे’फक्त अशीच दाद देताना आढळला.

आज खासदार सांस्कृतिक महोत्सवात सुनिधीने सजना जी वारी वारी, नी मै कमली, हलका हलका सुरूर, क्रेझी किया रे यासारख्‍या धडाकेबाज गीतांनी सुप्रसिद्ध हरहुन्‍नरी गायिका ‘देसी गर्ल’ सुनिधी चौहान यांनी नृत्‍य व गायनाने तरुणाईला क्रेझी केले. खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवाचा दिवस नाचगाण्‍याने चांगलाच गाजला.प्रत्येक मूडमधील तिची सुरांवरची पकड,सादरीकरण ही शब्दातीतच असते.

केंद्रीय मंत्री खासदार नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतील खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवाचा उत्तरार्ध शनिवारी ईश्वर देशमुख कॉलेजच्या मैदानात सुरु झाला आहे.. महोत्‍सवाच्‍या दुस-या दिवशी आज रविवारी सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांच्‍या गायनाने नागपूरकरांना भरभरून आनंद दिला. मोठ्या संख्‍येने तरुणाईने कार्यक्रमाला उपस्थिती लाऊन सुनिधीच्या आवाजाचे चाहते जगभरातच नव्हे तर नागपूरात देखील किती मोठ्य संख्येने आहेत,याची प्रचिती आणून दिली.

‘नी मै कमली कमली’ गीताने सुनिधीने धडाकेबाज एन्‍ट्री घेतली. दोन वर्षाच्‍या काळानंतर भारतातला पहिला लाइव्‍ह शो मी नागपुरात करते आहे. त्‍यामुळे मला आज नागपुरात गाताना खूप आनंद होतो आहे, असे सुनिधी चौहान म्‍हणाली. सुनिधीने एकामागोमाग एक रॉकींग परफॉर्मन्‍सेस दिले. क्‍यु ना हम तो, प्‍यार की एक कहानी सुनो, मिल गयी आज आसमां से, एक मै और एक तु है, जागे रे मन कही, मेनु इश्‍क तेरा ले डुबा, मेरी बाहों मे दुनिया भुला दे, अशा अनेक गीतांवर तरुणाई थिरकली. टाळ्या आणि शिट्टयांनी परिसर दणाणून गेला.

कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. दुस-या दिवसाच्‍या आयोजनाचे उद् घाटन कांचन गडकरी यांच्‍या हस्ते झाले. याप्रसंगी माजी महापौर कल्‍पना पांडे, अर्चना डेहनकर, नंदा जिचकार, मनिषा कोठे, मनिषा धावडे, महिला मोर्चा प्रमुख निता ठाकरे, माजी प्रमुख कीर्तीदा अजमेरा, एम्‍सच्‍या संचालक विभा दत्‍ता यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

प्रा. अनिल सोले या्ंनी प्रास्‍ताविक केले. सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी केले.

कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्‍य बाळ कुळकर्णी, अविनाश घुशे, हाजी अब्‍दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील यांनी सहकार्य केले.

आज महोत्‍सवात-

‘वंडर व्‍हाईस’ साईराम अय्यर यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या