
विदर्भातही कोल वॉशरीजचा गाेरख धंदा बंद करा
महाजनकोच्या नुकसानीला खंडारे,जाधव,बावणकुळे जवाबदार
नागपूर,ता.४ मार्च २०२२ : महाजनको ही कंपनी वेगवेगळ्या कोळसा खदाणीतून कोळसा विकत घेत असते.कोळसा विकत घेऊन तो कोळसा कोल वॉशरीजकडून धुतल्या जात असतो त्यानंतर तो धुतलेला कोळसा वेगवेगळ्या पॉवर प्लँटमध्ये वापरला जात असतो,या कोल वॉशरीजमध्ये कोळसा धूतल्यानंतर जवळपास १५ ते २० टक्के कोळसा हा रिजेक्ट म्हणून या कोल वॉशरीज कंपनी ज्या खासगी कंपनी अाहेत तो स्वत:जवळ ठेऊन घेत असते,मात्र हा करोडो टन कोळसा रिजेक्टच्या नावावर जवळपास फूकटातच कोल वॉशरीज कंपनींना मिळत असतो,या खासगी कंपनी तो कोळसा, खुल्या बाजारात चार हजार ते पाच हजार रुपये प्रती टनच्या हिशेबाने विकत असते यात सर्वाधिक तोटा महाजनको व पर्यायाने विदर्भातील वीज ग्राहकांना होत असतो,या गौडबंगालाची मुहुर्तमेढ ऐन निवडणकीचे वर्ष बघून २०१९ मध्ये माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी केली होती त्यामुळे बाणकुळे यांचे हात कोळश्यानेही काळे झाले असल्याची घणाघाती टिका राष्ट्रवादीचे नेते व ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी आज पत्र परिषदेत केली.
धुतलेल्या कोळ्याबाबतचा हा सर्व गौडबंगाल महाजनकोचे कार्यकारी संचालक संजय खंडारे व माईनिंगचे संचालक पुरुषोत्तम जावध यांच्या संगमताने होत असल्याचा आरोप पवार यांनी केला.महाराष्ट्रात कुठे ही कोल वॉशरीजचा धंदा केला जात नाही.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल वॉशरीजमधील हा कोट्यावधीचा घोटाळा लक्षात घेऊनच ही व्यवस्था हद्दपार केली होती मात्र बावणकुळे यांनी उर्जामंत्री असताना हिंद,अरिहंत व रुखमाई या तिन्ही खासगी कोल वॉशरीज कंपनीला कोल वॉशिंगचे कंत्राट देऊन आपले हात कोळश्यानेही काळे केल्याची टिका प्रशांत पवार यांनी केली.
या सर्व गौडबंगालामुळे महजनकोचे ३० ते ४० कोटींचे नुकसान होत आहे.एकीकडे महजनकाे ही पैसे नाहीचे रडगाणे गाते दूसरीकडे तीन लाख टन कोळश्याची धांदली ही कोल वॉशच्या नावावर करतेय.एकीकडे वीज ग्राहकांना वीज दर वाढीचा शॉक दिला जातो,शेतक-यांच्या कृषि पंपाची जोडणी कापली जाते दूसरीकडे २ कोटी टन कोळशा हा खुल्या बाजारात बेकायदेशीररित्या विकल्या जातो.हाच पैसा महाजनकोला उपयोगात आला असता मात्र या तिन्ही कंपनीना कोल वॉशसाठी पाच वर्षांचा कंत्राट देऊन खापरखेडा,कोराडी व चंद्रपूरच्या पॉवर प्लान्टमध्ये रिजेक्ट कोळशाची लृट सुरु असल्याचा आरोप पवार यांनी केला.
महाजनको रिजेक्ट कोळसा सुमारे ३०० ते ६०० रुपये प्रती टन या भावाने कोल वॉशरीज कंपन्यांना देते मात्र या कोल वॉशरीज कंपन्या हाच कोळसा खुल्या बाजारात ४ हजार ते ५ हजार रुपये प्रति टन विकत असते.
ही सर्व बाब महाजनकोचे कार्यकारी संचालक व मायनिंगचे संचालक यांच्या संगमताने होत असून यात शासनाची कर चोरी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली असल्याचा आरोप पवार यांनी केला.
नुकतेच चंद्रपूर पॉवर प्लान्टने एक हजार प्रती मेट्रीक टन बर्न कोळसा विकला,यावरुन कोल वॉशरीज यांना या एक हजार मेट्रीक टन कोळश्यामधून किती फायदा झाला याचा अंदाज डोळे दिपवणारा आहे.
शासनाने त्वरित या दोन्ही संचालकांची उचलबांगडी करुन माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या चौकशीचे आदेश द्यावे व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पवार यांनी केली.
पत्र परिषदेत संजय शिंदे,मिलिंद महादेवकर,अरुण वनकर,रविंद्र इटकेलवार आदी उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा