Homeनागपूर न्यूजसद्गुरूदास महाराजांच्‍या वाढदिवसानिमित्‍त धार्मिक व सामाजिक उपक्रम

सद्गुरूदास महाराजांच्‍या वाढदिवसानिमित्‍त धार्मिक व सामाजिक उपक्रम

Advertisements

नागपूर, ११ फेब्रुवारी २०२२: श्री दत्‍त संप्रदायातील विष्‍णूदास महाराजांचे अनुग्रहित शिष्‍य प. पू. सद्गुरुदास महाराजांचा ८१ वा वाढदिवस तिथीप्रमाणे जया एकादशीला म्‍हणजे शनिवार, १२ फेब्रुवारी रोजी असून त्‍यानिमित्‍त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.

श्री गजानन महाराज मंदिर, सहकानगर रुद्र, स्‍वाहाकार, संतपूजन उपासना, नामस्‍मरण असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले असून श्री गुरुमंदिर अंतर्गत बंगलोर, पुणे, लाखनी, गडचिरोली, पुणे व इतर सर्व केंदात विविध धार्मिक, आध्‍यात्मिक उत्‍सवांचे आयोजन करण्‍यात आले आहे.

भांबेरी, अकोला व पुणे येथे आज रक्‍तदान शिबिर घेण्‍यात येणार आहे.

प. पू. सद्गुरुदास महाराजांचा वाढदिवस तारखेनुसार २८ जानेवारी रोजी होता. त्‍यामुळे २८ जानेवारी ते १२ फेब्रुवारीदरम्‍यान विविध धार्मिक, आध्‍यात्‍मिक व सामाजिक उपक्रम राबवून त्‍यांचा वाढदिवस साजरा करण्‍यात आला. श्री. गुरुमंदिर परिवार, छत्रपती सेवा प्रतिष्‍ठान व पत्रभेट परिवार यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले.

नागपुरात भव्‍य रक्‍तदान शिबिर घेण्‍यात आले. डॉ. हेडगेवार रक्‍तपेढीच्‍या सहकार्याने आयोजित या शिबिरात तरुण उपासकांनी हिरीरीने सहभाग घेतला. जवळपास १७० उपासकांनी उत्‍स्‍फूर्तपणे रक्‍तदान केले. नागपूर, भंडारा, लाखनी, गडचिरोली, कारोडी, वणी, भद्रावती येथील उपासकांनी या रक्‍तदान यज्ञात आहुती दिली. अमरावती येथेदेखील रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले. यात ४५ उपासकांनी रक्‍तदान केले. सोबतच, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाच्‍या सहकार्याने श्री. गुरुमंदिर परिवारातील सर्व केंद्रांतील उपासकांनी सुर्यनमस्‍कार मोठ्या संख्‍येने सहभाग घेतला व २१४४२ सुर्यनमस्‍कार घालण्‍यात आले.

Latest बातम्या